Accident Twitter/ @ani_digital
देश

Chhattisgarh मध्ये भीषण अपघात, 7 शाळकरी मुलांचा मृत्यू; 4 जणांची प्रकृती चिंताजनक

छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील कोरेर चिल्हाटी चौक येथे ऑटो आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत पाच शाळकरी मुलांचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

Chhattisgarh: छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील कोरेर चिल्हाटी चौक येथे ऑटो आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत पाच शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात सुमारे 4 मुले गंभीर जखमी झाली आहेत. या भीषण अपघातावर मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर स्थिती पाहून स्थानिक रुग्णालयाने (Hospital) मुलांना कांकेर येथे रेफर केले. कोरेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. ऑटोमध्ये एकूण आठ मुले प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. भीषण धडकेनंतर ऑटोचा चक्काचूर झाला यावरुन अपघाताची तीव्रता कळू शकते.

तसेच, या अपघातात (Accident) चार मुलांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्थानिकांना सांगितले आहे. ऑटोचालकासह पाच मुले जखमी झाली. आता पाच मुलांचा मृत्यू झाल्याची पुष्टी खुद्द मुख्यमंत्र्यांनी ट्विट करुन दिली आहे.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट करत म्हटले की, 'कांकेर जिल्ह्यातील कोरेर चिल्हाटी चौकात ऑटो आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 5 शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. या अपघातात 4 मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमींवर उपचारासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. ज्यांनी आपली मुले गमावली त्यांच्या कुटुंबीयांना देव धैर्य देवो. प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT