छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर सुरक्षा बल अन् नक्षलवाद्यांमधील चकमकीत 6 नक्षलवादी ठार

चकमक स्थळावरून 6 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांशिवाय अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
Encounter on Telangana border, security forces killed 6 Naxalites

Encounter on Telangana border, security forces killed 6 Naxalites

Dainik Gomantak

तेलंगणा आणि छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून, त्यात 6 नक्षलवादी ठार झाले आहेत. तेलंगणाचे ग्रेहाऊंड सैनिक ऑपरेशनसाठी बाहेर पडले होते, त्यानंतर त्यांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. चकमक स्थळावरून 6 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांशिवाय अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. तेलंगणाचे कोट्टागुडम एसपी सुनील दत्त यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळी सतत शोधमोहीम सुरू आहे.

<div class="paragraphs"><p>Encounter on Telangana border, security forces killed 6 Naxalites</p></div>
तिरुमला तिरुपती मंडळाने जानेवारीसाठी जारी केली विशेष तिकिटं

किस्त्रम पीएस सीमेवरील जंगलात ही चकमक झाली. भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्याचे एसपी सुनील दत्त म्हणाले की, हे तेलंगणा (Telangana) पोलिस, छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिस आणि सीआरपीएफचे संयुक्त ऑपरेशन होते. सकाळी 10.30 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती आणि पोलिसांचे पथक सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

तेलंगणा ग्रेहाऊंड्स आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात दोन आयईडी सापडल्यानंतर ही चकमक झाली. जिल्ह्यातील सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी हे आयईडी प्लांट बनवण्यात आले होते. अहवालानुसार, नक्षलवादी आयईडीद्वारे सुरक्षा दलांना लक्ष्य करत आहेत कारण त्यांना बस्तर आणि अबुजमाद भागातील स्थानिक लोकांचा पाठिंबा कमी होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com