Hathrus 
देश

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सत्संगाच्यावेळी चेंगराचेंगरी, 27 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 25 महिलांचा समावेश

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील रतिभानपूर येथे सत्संगाच्या वेळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 27 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Manish Jadhav

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील रतिभानपूर येथे सत्संगाच्या वेळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 27 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 25 महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातात अनेक जण जखमीही झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. या अपघातात सुमारे 15 महिला आणि लहान मुलेही जखमी झाली आहेत. जखमींना एटा मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

चेंगराचेंगरीमुळे अपघात झाला

भोले बाबांच्या सत्संग कार्यक्रमादरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाल्याचे बोलले जात आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या अनेक भाविकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. प्रवचनासाठी आलेले शेकडो भाविक कडक उन्हामुळे बेहोश झाले. दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने शेकडो लोकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. ही घटना सिकंदरराव कोतवाली परिसरातील फुलराई गावात घडली.

या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर या संपूर्ण घटनेचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडून मागवण्यात आला आहे. चेंगराचेंगरीला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. दोषींना सोडले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"घरी बसला तेव्हा मी काम दिलं", 'Drishyam 3 ' मधून अक्षय खन्ना आउट; निर्माते कुमार मंगत संतापले; कायदेशीर कारवाईची दिली धमकी

Salman Khan Net Worth: गॅलेक्सी अपार्टमेंट, ऑडी-मर्सिडीज आणि बरंच काही... बॉलीवूडच्या 'भाईजान'ची एकूण संपत्ती किती? आकडे पाहून व्हाल हैराण

Rohit Sharma Record: सर्वाधिक शतकं... सचिन तेंडुलकरचा 'विराट' विक्रम धोक्यात; रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

Rare Goan food: 1960 नंतर कमी झालेले, दुर्मिळ गोवन अन्नपदार्थ

Goa Fraud Case: गोव्यातील 500 जणांना 2 कोटी 90 लाखांचा गंडा, जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक; सावंतवाडीतील तिघांना अटक

SCROLL FOR NEXT