Boat Capsizes in Gujarat Dainik Gomantak
देश

Boat Capsizes in Gujarat: गुजरातमध्ये तलावात उलटली बोट, 15 जणांचा मृत्यू; PM मोदींनी व्यक्त केला शोक

Children drowned in pond in Vadodara: गुजरातमधील वडोदराजवळील हरणी तलावात बोट उलटल्याची बातमी आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

Manish Jadhav

Children drowned in pond in Vadodara: गुजरातमधील वडोदराजवळील हरणी तलावात बोट उलटल्याची बातमी आहे. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला. या बोटीत खासगी शाळेचे विद्यार्थी होते. अपघातात बळी पडलेली सर्व मुले वडोदरा येथील न्यू सनराईज स्कूलमधील आहेत. या मुलांनी किंवा शिक्षकांपैकी कोणीही लाईफ जॅकेट घातलेले नव्हते. याच कारणामुळे बोट उलटल्यावर 15 जणांचा मृत्यू झाला. सध्या गोताखोर आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून बचावकार्य सुरु आहे.

घटनास्थळी उपस्थित पोलीस प्रशासन

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 10 मुलांना तलावातून बाहेर काढण्यात आले आहे. या बोटीत 20 हून अधिक मुले आणि शिक्षक होते. पोलीस आणि सर्व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

मुलांना लाइफ जॅकेटशिवाय बोटीत बसायला लावले

घटनास्थळी वडोदराचे जिल्हाधिकारी एबी गोरे आणि पोलिस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत हेही उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक तपासात वडोदरा महानगरपालिकेने या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचे समोर आले आहे. बोटिंगदरम्यान मुलांना लाईफ जॅकेटही देण्यात आले नाही. तलावातील बोटिंगचे कॉन्ट्रॅक्ट कोटिया कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

त्याचवेळी, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. X वर पोस्ट करताना ते म्हणाले की, ''वडोदराच्या हरणी तलावात बोट उलटल्यामुळे मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. प्राण गमावलेल्या निष्पाप मुलांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करतो. या दु:खाच्या काळात त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना. देव त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.'' बोटीतील विद्यार्थी आणि शिक्षकांचे बचावकार्य सध्या सुरु आहे. अपघातातील जखमींना तातडीने मदत आणि उपचार देण्याचे निर्देश यंत्रणेला मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.

पीएम मोदींनी भरपाई जाहीर केली

दरम्यान, वडोदराजवळील घडलेल्या घटनेने दुःख झाल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझी संवेदना शोकाकुल कुटुंबियांप्रती आहेत. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. स्थानिक प्रशासन बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत करत आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये दिले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT