Bhagwant Mann News, Punjab AAP News Dainik Gomantak
देश

भगवंत मान सरकारमध्ये मंत्रिपदासाठी चढाओढ

मंत्रिपदासाठी आमदारांची धावपळ सुरू झाली आहे.

दैनिक गोमन्तक

आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. 'आप'चे भगवंत मान पंजाबचे नवे मुख्यमंत्री होणार हे निश्चित असले तरी त्यांच्या मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार हे अजून स्पष्ट नाही. मंत्रिपदासाठी आमदारांची धावपळ सुरू झाली आहे. मंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे राहण्यासाठी अनेकांनी दिल्लीकडे धाव घेतल्याची माहिती समोर येत आहे. (Punjab AAP News)

पंजाबमध्ये (Punjab) 'आप'च्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होताच, नवे आमदार सक्रिय झाले आहेत. जगरांवमधून दुसऱ्यांदा निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचलेल्या सर्वजित कौर मनुके या मंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. याशिवाय काँग्रेसमधून 'आप'मध्ये सामील होऊन आमदार झालेले लोक देखील इच्छुक आहेत.

शहरी भागातून दलजितसिंग गरेवाल भोला आणि उत्तरचे आमदार मदनलाल बग्गा हे प्रमुख उमेदवार आहेत. दलजित सिंग करेवाल यांनी यापूर्वीही 'आप'च्या तिकिटावर निवडणूक लढवली असून ते 'आप'चे जिल्हाप्रमुखही राहिले आहेत. काही काळ काँग्रेसमध्ये (Congress) राहिल्यानंतर ते 'आप'मध्ये परतले आणि तिकीट मिळवण्यातही ते यशस्वी झाले. त्यांचे 'आप'च्या केंद्रीय नेतृत्वाशी संबंध आहेत. उत्तरेतील आमदार मदनलाल बग्गा यांनी अकाली दल सरकारच्या काळात राज्यमंत्रिपद भूषवले असून त्यांनी उत्तरमधून सातवेळा आमदार राकेश पांडे यांचा पराभव केला आहे. त्यांचा कॅबिनेट पद मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 'आप'चे (AAP) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल कुणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT