Manoj Muntashir Shukla Dainik Gomantak
देश

''जागतिक शांततेचा नोबेल जर कोणाला द्यायचा असेल तर...''; राम मंदिराच्या कार्यक्रमात मनोज मुंतशीर स्पष्टच बोलले

Manish Jadhav

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. या कार्यक्रमाबाबत जगभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यातच, 'साहित्य आज तक च्या लखनऊ'मधील 'मेरे घर राम आये हैं' या सत्रात गीतकार आणि लेखक मनोज मुंतशीर शुक्ला प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी श्री राम मंदिर अभिषेक सोहळ्याच्या संदर्भात मंचावरुन आपले विचार व्यक्त केले. मुंतशीर म्हणाले की, साक्षात प्रभु श्रीरामांनी मला बोलावले आहे.

दरम्यान, साहित्य आज तक च्या मंचावर येताच मनोज मुंतशीर शुक्ला यांनी जय श्री रामाचा जयघोष केला. विशेष म्हणजे, त्यांनी या जयघोषणेचा आवाज मंगळ ग्रहापर्यंत पोहोचला पाहिजे असे आवाहनही उपस्थितांना केले. कार्यक्रमादरम्यान जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही कधी राम मंदिर बांधले जाईल याबाबत विचार केला होता. यावर मनोज म्हणाले की, ''खरं सांगायचं तर मी असा विचार कधीच केला नव्हता.'' ते पुढे म्हणाले की, 'मी खूप आशावादी आहे, माझा जन्म याच राज्यात झाला आहे. मी इथे अमेठीमध्ये लहानाचा मोठा झालो, पण असा विचार कधीच केला नाही. पण आज जेव्हा हे राम मंदिर बांधले जात आहे. खरे सांगायचे तर हे सारं स्वप्नवत वाटतं. मला भीती वाटते की, या स्वप्नातून कोणीतरी मला जागे करेल.''

दुसरीकडे, रामप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास उरले आहेत. हे स्वप्न असेल तर हे स्वप्न आयुष्यभर अखंड राहावे अशी माझी इच्छा आहे. त्याचबरोबर हे स्वप्न आयुष्यभर टिकावं अशी माझी इच्छा आहे, असेही मुंतशीर पुढे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ''प्रभु श्रीरामाचा जन्म अयोध्येत झाला हे आपल्याच देशात सिद्ध करत राहणे ही मोठी विडंबना आहे. 1885 ते 2019 पर्यंत आपण अशी कायदेशीर लढाई लढत राहिलो, ही अत्यंत खेदाची बाब आहे.''

मुंतशीर पुढे म्हणाले की, ''या गोष्टीने मला नेहमीच त्रास दिला की आपण राम मंदिर मक्केत किंवा मदिनेमध्ये मागत नाही. आपण अयोध्येत ही मागणी करत होतो. त्यांनी ते प्रेमाने द्यायला हवे होते, पण हा मूर्खपणा इतकी वर्षे कायदेशीर लढला गेला. जे सरकारी वकील दरवर्षी रामनवमी, दसरा, दिवाळीला सुटी घेत असत, त्यांनाही श्रीराम अस्तित्वात आहेत का याचा पुरावा कोर्टात हवा होता.'' मनोज मुंतशीर पुढे म्हणाले की, 'मला कळत नाही की मंदिराची मागणी करताच आपण असहिष्णू कसे काय होतो.''

मुंतशीर पुढे म्हणाले की, '' एकदा इतिहासात डोकावून बघा आणि असे उदाहरण कुठेही सापडेल का, जिथे बहुसंख्य असलेल्या लोकांना 500 वर्षे आपल्या हक्कासाठी लढावे लागले आणि तेही रक्ताचे पाट न वाहता. हा हिंदू किती सहिष्णू आहे हे मी कसे सांगू? जागतिक शांततेचे नोबेल जर कोणाला द्यायचे असेल तर ते कोणा एका व्यक्तीला नको तर 100 कोटी भारतीयांना द्यायला हवे ज्यांनी आपल्या हक्कांसाठी इतक्या शांततेने लढा दिला.'' ते पुढे म्हणाले की, 'आम्ही संपूर्ण जगाला आमची मातृभूमी मानतो, आम्ही हिंदू आहोत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Navratri 2024: छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा दरबारातील सरदाराने गोव्यात बांधलेले एकमेव मंदिर

Rashi Bhavishya 5 October 2024: बिझनेसमध्ये धनप्राप्तीचा योग, पितृसुखाची छाया आणि खरेदीचा उत्तम संयोग; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Goa Crime News: पैशांसाठी मित्रांचा खून करणारा काजीदोनी दोषी; संशयिताची बाजू ऐकून कोर्ट ठोठावणार शिक्षा

Subhash Velingkar: 'वेलिंकरांना अटक करा, नाहीतर...'; संतप्त जमावाचा सरकारला अल्टिमेटम; डिचोलीत गुन्हा दाखल!

Delhi Drug Case: मोठा खुलासा! गोव्यामार्गे दिल्लीत पोहोचले ड्रग्ज; साडेपाच हजार कोटींच्या 562 किलो कोकेन‌ची तस्करी

SCROLL FOR NEXT