Ram Mandir: ''खोट्या बातम्या पसरवू नका...'', राम मंदिर कार्यक्रमाबाबत सरकारची माध्यमांना सक्त ताकीद

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे.
Ram Mandir in Ayodhya
Ram Mandir in Ayodhya Dainik Gomantak
Published on
Updated on

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. या कार्यक्रमाबाबत जगभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 16 जानेवारीपासून पूजाविधीला सुरुवात झाली आहे. अशातच, अयोध्येतील राम मंदिर कार्यक्रमाशी संबंधित पोस्ट सोशल मीडियावर दिसत आहेत. यातील अनेक पोस्ट दिशाभूल करणाऱ्याही आहेत, त्याबाबत सरकार सख्त झाले आहे. अयोध्येच्या भव्य सोहळ्यापूर्वी व्हीआयपी तिकिटे आणि राम मंदिराचा प्रसाद देण्याचा दावा करणाऱ्या अनेक बनावट लिंक्स सोशल मीडियावर दिसत आहेत, ज्यावर सरकारने आता कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, सरकारने मीडिया आऊटलेट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्संना राम मंदिराच्या कार्यक्रमाशी संबंधित खोटा कंटेट प्रकाशित करणे टाळण्यास सांगितले आहे.

सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने एक ॲडवायझरी जारी करताना म्हटले आहे की, सोशल मीडियावर काही असत्यापित, चिथावणीखोर आणि बनावट संदेश पसरवले जात आहेत... जे धार्मिक सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू शकतात. ॲडव्हायझरीमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्संना अशी सामग्री प्रकाशित न करण्यासाठी वाजवी प्रयत्न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Ram Mandir in Ayodhya
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राममूर्तीचे लोभस ‘दर्शन’ दृष्टिक्षेपात; म्हैसूरचे अरुण योगिराज यांचे अद्वितीय कलाकौशल्य

बनावट व्हीआयपी पास विकले जात होते

ई-कॉमर्स साइट ॲमेझॉनला शुक्रवारी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून 'श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद' ची सूची काढून टाकण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर Amazon ने सांगितले की, ते त्यांच्या धोरणांच्या अनुषंगाने अशा सूचींविरुद्ध योग्य कारवाई करत आहेत. काही दिवसांपूर्वी, रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी तातडीने व्हीआयपी तिकीट देण्याचे आश्वासन देऊन बनावट क्यूआर कोड असलेला एक व्हॉट्सॲप मेसेज मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर मंदिर ट्रस्टने स्पष्ट केले होते की, ट्रस्टने स्वतःच अभिषेक कार्यक्रमासाठी निवडक पाहुण्यांना निमंत्रणे पाठवली आहेत.

Ram Mandir in Ayodhya
Ram Mandir: 'त्या' पाच न्यायाधीशांना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

दुसरीकडे, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ॲमेझॉनला 'श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद' नावाने मिठाई विकल्याबद्दल नोटीस पाठवली होती. नोटीस मिळाल्यानंतर, ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने शनिवारी सांगितले की, अशा विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल. Amazon ने कबूल केले की, CCPA कडून काही विक्रेत्यांकडून दिशाभूल करणाऱ्या उत्पादनांच्या दाव्यांबाबत नोटीस मिळाली आहे आणि कंपनी त्यांची चौकशी करत असल्याचे सांगितले. ॲमेझॉनच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले की, "आम्ही आमच्या धोरणांनुसार अशा सूचींविरुद्ध योग्य कारवाई करत आहोत." 'श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद' नावाने मिठाई विकल्याबद्दल CCPA ने Amazon ला नोटीस पाठवली. दरम्यान, शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार CCPA ने या संदर्भात Amazon कडून सात दिवसांत उत्तर मागितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com