Delhi Dainik Gomantak
देश

'...म्हणून भाजपला केजरीवालांची हत्या करायचीय': मनीष सिसोदिया

पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या जबरदस्त विजयानंतर भाजपला (BJP) अरविंद केजरीवाल यांना मारायचे आहे, असे आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

पंजाबमधील (Punjab) आम आदमी पार्टीच्या जबरदस्त विजयानंतर भाजपला अरविंद केजरीवाल यांना मारायचे आहे, असा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी केला आहे. आज पोलिसांच्या उपस्थितीत भाजपचे (BJP) गुंड मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना निवडणुकीत पराभूत करु शकले नाहीत, तर त्यांना आता मारायचा कट रचत आहेत. या प्रकरणात ते धोकादायक खेळ खेळत आहेत. राजकारण हे एक निमित्त आहे, ते सरळ गुन्हेगारी प्रकरण आहे. गुंड अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकतात का? (Manish Sisodia accuses BJP of trying to kill Arvind Kejriwal after victory in Punjab)

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाने अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर धडक मोहीम काढली. सकाळी साडेअकरा वाजता हे आंदोलन सुरु झाले होते. मुख्यमंत्र्यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे दुखावलेले 150 ते 200 भाजप कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यासाठी आले होते. 1 वाजण्याच्या सुमारास काही आंदोलक 2 बॅरिकेड्स तोडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर पोहोचले आणि घोषणाबाजी करु लागले. आंदोलकांसोबत एक पेंट बॉक्सही होता, निवासस्थानाच्या गेटवर रंग टाकण्यात आला. यावेळी बूम बॅरिअर आणि सीसीटीव्ही कॅमेरा तुटलेले आढळून आले. पोलिसांनी 70 जणांना ताब्यात घेतले असून कायदेशीर कारवाई सुरु आहे.

तसेच, याबाबत आप नेते संजय सिंह (Sanjay Singh) यांनीही ट्विट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलयं की, ''लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजपच्या गुंडांनी हल्ला केला. मात्र त्यांना रोखण्याऐवजी दिल्ली पोलीस त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून आले. भाजपवाले लक्षात ठेवा, सर्वांचा हिशोब घेतला जाईल, ही लोकशाही आहे, इथे वेळ आल्यावर लोक तुम्हाला मतांच्या लाठ्या मारतील.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: नागेशीत 'गोविंदा रे गोपाळा'च्या गजरात दही हंडी साजरी

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT