Crime News Dainik Gomantak
देश

राजस्थानमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना, सासरच्या मंडळींनीच गर्भवतीची काढली नग्न धिंड

Woman Paraded In Pratapgarh: राजस्थानमधून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Woman Paraded In Pratapgarh: राजस्थानमधून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. गर्भवती महिलेच्या सासरच्यांनी तिची विवस्त्र परेड काढली. राजस्थानमधील प्रतापगडमधून आलेला व्हिडिओ मणिपूरची आठवण करुन देणारा आहे.

धारियावाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पहाडा गावात एका गर्भवती महिलेची नग्नावस्थेत परेड काढण्यात आली. पीडितेचे वर्षभरापूर्वी लग्न झाल्याचे सांगण्यात येत आहे.

घरापासून हाकेच्या अंतरावर दुसऱ्या वस्तीत राहणाऱ्या एका तरुणाने महिलेला आपल्या घरी नेले होते. तरुणासोबत जाण्याची चूक महिलेला महागात पडली.

महिलेला सुमारे 1 किमी धावायला लावले

दरम्यान, पीडितेची नग्न परेड काढल्याची माहिती मिळताच तिचे वडिल, सासरची मंडळी आणि आजूबाजूचे लोक तिथे पोहोचले.

या लोकांनी आधी महिलेला बेदम मारहाण केली आणि नंतर तिला विवस्त्र करुन 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावाबाहेरील नदीवर पळवून लावले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर गेहलोत सरकार आणि राजस्थान पोलीस झोपेतून जागे झाले.

सीएम गेहलोत यांनी कारवाईचे आश्वासन दिले

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. पोलिसांनी या संपूर्ण घटनेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची भाषा केली आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणावर भाजपने राजस्थान सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

एडीजी क्राईम यांना सूचना दिल्या

सीएम अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी म्हटले की, प्रतापगड जिल्ह्यात, पीहार आणि तिच्या सासरच्या लोकांमधील कौटुंबिक वादामुळे एका महिलेची नग्न परेड काढली.

पोलीस महासंचालकांना घटनास्थळी एडीजी क्राईम पाठवून याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सुसंस्कृत समाजात अशा गुन्हेगारांना स्थान नाही. या गुन्हेगारांना लवकरात लवकर तुरुंगात टाकले जाईल आणि फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल.

या प्रकरणावर डीजीपी उमेश मिश्रा म्हणाले की, 'ही घटना अत्यंत क्रूर आहे. सायंकाळी हा प्रकार स्थानिक पोलिसांना कळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण माहिती घेऊन कायदेशीर कारवाई सुरु केली.

या घटनेत सहभागी असलेल्या सासरच्या सर्व लोकांची ओळख पटली आहे. आमचे पथक सातत्याने छापे टाकत आहेत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT