CM Biren Singh News: मणिपूरमधील हिंसाचारामुळे बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरेन सिंह मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात. मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे अशांतता आहे.
कुकी आणि नागा समुदायाचे लोक उच्च न्यायालयाच्या मैईतेई समुदायाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या आदेशाला विरोध करत आहेत. मणिपूरमध्ये 3 मेपासून परिस्थिती खराब आहे. आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
मणिपूरमध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. मात्र, आता बिरेन सिंह मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.
दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवसीय मणिपूर (Manipur) दौऱ्यावर आहेत. हिंसाचारात बळी पडलेल्यांची वास्तविकता जाणून घेण्यासाठी आपण आलो असल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
राज्यात शांतता प्रस्थापित करण्यास मदत करणे हा त्यांच्या दौऱ्याचा उद्देश असल्याचा दावाही करण्यात आला होता, परंतु त्यांच्या दौऱ्यादरम्यानही हिंसाचाराचे चित्र समोर येत राहिले.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आज मोइरांग शहरात असून त्यांनी रिलिफ कॅम्पना भेट दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कीशम मेघचंद्र यांनी आज सकाळी सांगितले होते की, राहुल गांधी रिलिफ कॅम्पना भेट देतील. यादरम्यान ते हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या लोकांशी संवाद साधतील.
यानंतर ते राजधानी इंफाळला परततील. इंफाळमध्ये राहुल 10 समविचारी पक्षाचे नेते, युनायटेड नागा कौन्सिल (UNC) नेते आणि नागरी समाजाच्या सदस्यांना भेटतील.
इंफाळमध्ये गुरुवारी रात्री जमाव पुन्हा अनियंत्रित झाला, सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली. यादरम्यान परिस्थिती इतकी बिघडली की, जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलाला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
राहुल राज्याच्या दौऱ्यावर असताना इंफाळमध्ये हिंसाचार झाला. सायंकाळी उशिरा ते इम्फाळमधील मदत शिबिरात पोहोचले. येथे त्यांनी हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या लोकांची भेट घेतली.
दरम्यान, विष्णुपूरचे एसपी बलराम सिंह म्हणाले की, आता शस्त्रेही आधुनिक येऊ लागली आहेत, वापरली जात आहेत, आता पुढच्या टप्प्यावर आयईडी स्फोटही होऊ लागले आहेत, काही दिवसांपूर्वीपर्यंत, आणि सध्याची परिस्थिती पाहता आम्ही फक्त व्हीआयपींना परवानगी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.