Manipur Violence: कांगपोकपीमध्ये दंगलखोर आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; अनेक जण जखमी, अतिरिक्त सैन्य तैनात

Manipur News: दरम्यान, गुरुवारी सकाळी मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यातील हरोथेल गावात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला.
Manipur Violence
Manipur ViolenceDainik Gomantak
Published on
Updated on

The Indian Army responded to unprovoked firing in Manipur: मणिपूरमध्ये अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यातील हरोथेल गावात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला.

गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. यानंतर आता गोळीबार थांबला आहे. अज्ञातांनी विनाकारण गोळीबार केल्याचे सांगण्यात आले. सैन्याने सांगितले की, अतिरिक्त नुकसान टाळण्यासाठी सैन्याने सुसज्जपणे प्रत्युत्तर दिले.

सैन्याच्या तत्पर कारवाईमुळे गोळीबार थांबला असल्याचे सूत्रांनी सांगितले. हरोथेल गावात पहाटे ५.४५ च्या सुमारास बंदूकधाऱ्यांनी विनाकारण गोळीबार सुरू केला.

आसाम रायफल्सच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले आणि गोळीबार थांबला. सध्या राज्यातील विविध भागांत सर्च ऑपरेशन्स चालू आहेत.

Manipur Violence
"30 मिनिटांच्या नमाजमुळे हानी होणार नाही"; नमाजवर बंदी घालण्यास Madras High Court चा नकार

ईशान्येकडील मणिपूर राज्यातील मेईतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत अनेक जण जखमी झाले आहेत.

Manipur Violence
United Nations: भारताच्या लढ्याला अखेर यश! या 'नकोश्या' यादीतून यूएन ने हटवले नाव

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मेईतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीला विरोध करण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये 3 मे रोजी 'आदिवासी एकता मोर्चा' काढण्यात आल्यानंतर प्रथम संघर्ष झाला.

माहितीनुसार, मणिपूरमधील लोकसंख्येच्या 53 टक्के लोकसंख्या मेईतेई आहे आणि ते बहुतेक इम्फाळ खोऱ्यात राहतात. त्याच वेळी, आदिवासी लोकसंख्या नागा आणि कुकी लोकसंख्येच्या सुमारे 40 टक्के आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com