Man working on laptop on bike Dainik Gomantak
देश

Viral Video: काय हे वेडेपण! भररस्त्यात दुचाकी चालवताना लॅपटॉपवर काम, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

Viral Video News: इंटरनेटवर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण आपल्या दुचाकीवर प्रवास करताना लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे.

Sameer Amunekar

आजच्या धावपळीच्या युगात 'मल्टीटास्किंग'चे फॅड सर्वांनाच लागले आहे, पण या ध्येयापायी काही लोक आपल्या आणि इतरांच्या जीवाशी कसा खेळ खेळतात, याचे एक धक्कादायक उदाहरण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. इंटरनेटवर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण आपल्या दुचाकीवर प्रवास करताना लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे. हे दृश्य पाहून कोणालाही धक्का बसेल, कारण रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांना बगल देत या तरुणाने केलेला हा पराक्रम अत्यंत धोकादायक आहे.

बाईकची 'टँकी' बनली ऑफिस डेस्क

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये, एक व्यक्ती आपल्या मोटारसायकलवर स्वार होऊन हायवेवरून जात असल्याचे दिसते. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटते, पण जसा कॅमेरा झूम होतो, तसे समोरचे दृश्य पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या तरुणाने आपल्या दुचाकीची इंधन टाकी (Petrol Tank) लॅपटॉप ठेवण्यासाठी वापरली आहे. एका हाताने गाडीचे हँडल सांभाळत आणि दुसऱ्या हाताने कीबोर्डवर बोटे चालवत, तो अत्यंत शांतपणे लॅपटॉपकडे पाहून काम करताना दिसतो.

कामाचा अतिरेक की प्रसिद्धीचा स्टंट?

व्हिडिओमध्ये तो तरुण कोणत्या डिजिटल कामात मग्न आहे हे स्पष्ट होत नाही, मात्र त्याच्या चेहऱ्यावरील गांभीर्य पाहून तो एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टवर किंवा तातडीच्या ऑनलाइन कामात व्यस्त असल्याचे वाटते.

त्याने आपला पूर्ण लक्ष रस्त्यावरून काढून लॅपटॉपच्या स्क्रीनवर केंद्रित केले आहे. सुरक्षिततेचे सर्व निकष धाब्यावर बसवून, हायवेसारख्या ठिकाणी असे कृत्य करणे ही केवळ वेडेपणाची हद्द आहे. कदाचित 'वर्क फ्रॉम एनीवेअर' या कन्सेप्टला या तरुणाने चुकीच्या पद्धतीने गांभीर्याने घेतल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

सोशल मीडियावर संतापाची लाट

हा व्हिडिओ एक्स (X) वर @NishadIndra1 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. काही क्षणांतच हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला असून, त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. नेटकऱ्यांनी या तरुणाच्या धाडसाचे कौतुक करण्याऐवजी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अनेक वापरकर्त्यांनी याला 'आत्मघातकी कृत्य' म्हटले आहे, तर काहींनी ट्रॅफिक पोलिसांनी यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. भररस्त्यात गाडी चालवताना अशा प्रकारे विचलित होणे म्हणजे केवळ स्वतःचाच नव्हे तर इतर वाहनचालकांचाही जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smart Meter: स्मार्ट वीज मीटर प्रकल्प घोटाळाच, 'सिटीझन्स फॉर डेमोक्रेसी'चा आरोप

VIDEO: भयंकर गोळीबार! 17 शेतकऱ्यांची निर्घृण हत्या, सगळीकडे रक्ताचा सडा; धक्कादायक व्हिडिओ समोर

Mining: सिंधुदुर्गातील 'ते' खनिज गोव्यात? उपग्रह छायाचित्रांच्या आधारे तक्रार, चौकशीची मागणी

खरी कुजबुज: भाजप देणार नवे चेहरे?

Brazil vs Morocco, FIFA World Cup 2026: विश्वचषकाचा 'किंग' ब्राझील, सलामीच्या सामन्यात पराभव नाहीच, 88 वर्षांची परंपरा कायम

SCROLL FOR NEXT