Crime News Dainik Gomantak
देश

West Bengal Crime: बंगालमध्ये 37 वर्षीय व्यक्तीने गळफास लावून संपवले जीवन; नागरिकत्व दुरुस्ती कायदा झाल्यापासून...

West Bengal Crime: कोलकात्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 37 वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली.

Manish Jadhav

West Bengal Crime: कोलकात्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 37 वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी चकित करणारे वक्तव्य केले. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू झाल्यापासून तो घाबरला होता, असा दावा पीडित व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला. गुरुवारी त्याने नातेवाईकाचे घर गाठून गळफास लावून घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. दुसरीकडे, टीएमसी याप्रकरणी ॲक्शन मोडमध्ये आली आहे. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी या मुद्द्यावर पाच सदस्यीय शिष्टमंडळ तयार केले असून ते या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

दरम्यान, सोनारपूर पोलिस स्टेशनच्या ई-मेल नोटने पुष्टी केली की, देबाशीष सेनगुप्ता यांनी दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील सब्सग्राम येथे एका नातेवाईकाच्या घरी गळफास लावून घेतला. सोनारपूर ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. आत्महत्या प्रकरणात, सेनगुप्ता यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची आणि एनआरसीची संभाव्य अंमलबजावणी पाहता त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल चिंता सतावत होती.

दुसरीकडे, आत्महत्येच्या मुद्द्यावरुन तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी गुरुवारी पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी पाच सदस्यीय शिष्टमंडळ तयार केले. पक्षाच्या म्हणण्यानुसार, त्यात राज्यसभा सदस्य नदीमुल हक, मंत्री शशी पंजा, जादवपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सयोनी घोष, पक्षाचे नेते कुणाल घोष आणि स्थानिक नगरसेवक अरुप चक्रवर्ती यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT