Man performing a dangerous stunt using a gas cylinder and gas stove in a viral video Dainik Gomantak
देश

Dangerous Stunt Viral: 'घरातील गॅस सिलेंडर सुरु केला अन् थेट शेगडीवरच...', सोशल मीडियावर जीवघेणा स्टंट व्हायरल; नेटकऱ्यांनी पठ्ठ्याला घेतलं फैलावर

Dangerous Stunt Video: इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेल्या या नव्या व्हिडिओमध्ये एका तरुणाने रील बनवण्यासाठी थेट वेडेपणाचा कळस गाठला.

Manish Jadhav

Dangerous Stunt Video: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही, तर प्रसिद्धी मिळवण्याचे एक मोठे माध्यम बनले आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूबवर रिल्स बनवून रातोरात स्टार होण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहत आहेत. अनेक लोक अत्यंत कल्पक आणि मजेशीर रिल्स बनवून लोकांचे मनोरंजन करतात, हे कौतुकास्पद आहे. मात्र, अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा काही लोक केवळ व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता धोकादायक स्टंट आणि विचित्र कृत्ये करु लागतात.

स्वतःला इतरांपेक्षा वेगळे दाखवण्याच्या नादात अनेकदा अविचाराने पावले उचलली जातात, ज्याचा एक धक्कादायक नमुना सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेल्या या नव्या व्हिडिओमध्ये एका तरुणाने रील बनवण्यासाठी थेट वेडेपणाचा कळस गाठला. या तरुणाने आधी घरातील गॅस सिलेंडर सुरु करुन शेगडी पेटवली. त्यानंतर, चक्क त्या पेटत्या शेगडीच्या अगदी वर येऊन तो जमिनीवर पुश-अप्स मारु लागला. पुश-अप्स मारताना तो तरुण सतत त्या आगीच्या ज्वाळांच्या अतिशय जवळ जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. थोडी जरी चूक झाली असती किंवा त्याचा तोल गेला असता, तर कपड्यांना आग लागून मोठा अपघात घडू शकला असता. अशा प्रकारे रिल्ससाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणे हा केवळ वेडेपणा नसून अत्यंत बेजबाबदारपणाचे लक्षण आहे.

हा धक्कादायक व्हिडिओ 'एक्स'वर एका युझरने शेअर केला असून, कॅप्शनमध्ये उपरोधाने लिहिले की, 'कंटेंट असा बनवा की कोणी कॉपी करु शकणार नाही, या भावाने तर कमालच केली.' हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून, त्यावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. एका युझरने लिहिले की, 'क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली हा निव्वळ वेडेपणा सुरु आहे.' तर दुसऱ्या युझरने 'हा माणूस पूर्णपणे पागल झाला आहे का?' असा सवाल केला. काही युझर्सनी थेट पोलिसांना टॅग करुन अशा जीवघेणे स्टंट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी चाललेला हा जीवघेणा खेळ लवकरात लवकर थांबणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ST Reservation: गोव्यात 'एसटी' आरक्षणाची केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी! चार मतदारसंघ राखीव, फळदेसाई-डिकॉस्टा-सिक्वेरा-कवळेकर यांचे राजकीय गणित बदलणार?

World Longest Hair Record: लांब केसांची भन्नाट क्रेझ! उत्तराखंडच्या महिलेनं रचला अनोखा रेकॉर्ड; केसांची लांबी पाहून तुम्हीही व्हाल थक्क Watch Video

खरी कुजबूज: आजारालाही वेळ ठरलेली?

Bikes Under 60000: कमी बजेटमध्ये घ्या शानदार बाईक! TVS, Heroसह 'या' बाईक्स देतील 70 kmpl पर्यंत जबरदस्त मायलेज; किंमतही खिशाला परवडणारी

Cricket Viral Video: अशी टीम तुम्ही कधी पाहिली नसेल! खेळाडू कमी पडल्यानं कुत्र्याला घेतलं संघात; मैदानातील व्हिडिओनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT