Crime News Dainik Gomantak
देश

Bangalore: शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने नवऱ्याने केली बायकोची हत्या

Crime News: बंगळुरुमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Bangalore Crime News: बंगळुरुमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे, एका व्यक्तीने पत्नीने लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तिची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नराधमाने मृतदेह शिर्डी घाटातील खड्ड्यात फेकून दिला. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने थेट पोलिस स्टेशन गाठले आणि पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली.

रिपोर्टनुसार, आरोपी मूळचा बिहारचा (Bihar) असून तो बेंगळुरुमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता. पृथ्वीराज सिंह असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने नऊ महिन्यांपूर्वी ज्योती कुमारीशी लग्न केले होते. लग्नाच्या वेळी पत्नीने वयाबद्दल चुकीची माहिती दिल्यामुळे मी तिच्यावर रागावलो होतो, असे आरोपीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले.

पत्नी कधीच सेक्ससाठी सहमत नव्हती

त्याने पोलिसांना सांगितले की, 'ती माझ्याबरोबर शरीर संबंध ठेवण्यास तयार नव्हती.' आरोपीने (Accused) पोलिसांना पुढे सांगितले की, 'पत्नीने तिचे वय वर्षे 28 असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते. परंतु नंतर कळले की, ती माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी होती. तिचे वय 38 वर्ष होते. ती माझ्याबरोबर शरीर संबंध ठेवण्यास तयार नव्हती. ती सातत्याने माझ्या कुटुंबियांना अपमानित करायची.'

बिहारमधील मित्रालाही फोन केला होता

त्याने पुढे पोलिसांना (Police) सांगितले की, 'रागाच्या भरात ज्योतीला जीवे मारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ज्योतीला मारण्यासाठी समीर कुमारला बोलावून घेतले. 3 ऑगस्ट रोजी आम्ही उडापी गेलो होतो. तिथेच संधीचा शोध घेऊन ज्योतीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शिर्डी घाटातील खड्ड्यात फेकून दिला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पत्नी हरवल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025: 'पर्रीकरांनी हा महोत्सव गोव्यात आणला ही मोठी भाग्याची गोष्ट', तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष के. अण्णामलाई यांचे गौरवोद्गार

Taleigao: 'माझे जीवन धोक्यात, मला या रस्त्यांवरून प्रवास करण्याची भीती वाटते'; ताळगावमधील दुरवस्था, सोशल मीडियावर पोस्ट Viral

Goa Crime: गोव्यात आला कामाच्या शोधात, सोबत आणला गांजा; ओडिशातील 29 वर्षीय युवकाच्या आवळल्या मुसक्या

Goa Politics: खरी कुजबुज; घोडा काँग्रेसच्या वाटेवर?

Goa Cricket: 8 चौकार, 3 षटकार! गोव्याच्या 'तनिषा'ची वादळी खेळी व्यर्थ; आंध्र प्रदेशचा 18 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT