man found 60 crore rupees cash inside storage unit he bought for 40 thousand  Danik Gomantak
देश

विकत घेतल्या सेकंड हँड वस्तू, त्यात मिळाली 60 कोटींची रोकड मग...

40 हजार रुपयांना एक वस्तू खरेदी केली आणि त्यात मिळाली 60 कोटींची रोकड

दैनिक गोमन्तक

एका व्यक्तीने स्टोरेजसाठी तब्बल 40 हजार रुपयांना एक वस्तू खरेदी केली होती. ज्यामध्ये त्याला 60 कोटी रुपयांची रोकड सापडली. परंतु त्यानंतर या पैशाच्या खऱ्या मालकाला या संपुर्ण घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्या व्यक्तीला ते पैसे मालकाला परत करावे लागले.

स्टोरेज वॉर्स या टीव्ही शोचा होस्ट डॅन डॉटसनने 4 वर्षांपूर्वी सोशल मीडियावर या घटनेचा खुलासा केला आहे. तो म्हणाला की त्याच्या एका क्लायंटने लिलाव करताना काही वस्तू विकत घेतल्या आणि त्यानंतरच ही सगळी माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर एक क्लिप पोस्ट करून, डॅनने सांगितले की ज्या व्यक्तीने स्टोरेज कंटेनर विकत घेतला त्याला कंटेनरमध्ये एक बॅग दिसली. त्याने दुसऱ्या व्यक्तीला बॅग उघडण्यासाठी बोलावले. त्याने बॅग उघडली तेव्हा त्यात सुमारे 60 कोटी रुपये होते.

मात्र, त्या पेटीच्या मालकाला काही दिवसांनी आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी वकिलांना त्या व्यक्तीकडे पाठवले. द ब्लास्ट मॅगझिनशी झालेल्या संभाषणात डॅन म्हणाले - सुरुवातीला वकिलांनी त्या व्यक्तीला सुमारे 4 कोटी रुपयांचे बक्षीस देऊ केले होते. ज्याला त्या व्यक्तीने नकार दिला होता. दुसऱ्यांदा सुमारे 9 कोटी रुपयांची ऑफर त्या व्यक्तीला देण्यात आली.

पुढे डॅन म्हणाला की , "मला वाटत नाही की बॅगमध्ये 60 कोटी रोख ठेवून तुम्ही विसरू शकता. ही रोख रक्कम दुसऱ्याला ठेवण्यासाठी दिली होती असे दिसते. मात्र, केवळ त्यांच्या पैशासाठी एखाद्याला 9 कोटी रुपयांचे बक्षीस देणे ही मोठी गोष्ट आहे. जे सहसा कोणी करू शकत नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Verna Fire: गोव्यात 'आगीचं सत्र' सुरूच! हडफडे घटनेची धग कायम असतानाच, वेर्णा येथील भंगारअड्ड्याला भीषण; कारण अस्पष्ट

Mapusa Accident: म्हापसात भीषण अपघात! 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; पोलिसांकडून पुढील तपास सुरु

Banks New Verification Rule: ऑनलाइन फ्रॉडला आता 'ब्रेक'! देशभरातील बँकांकडून पडताळणीच्या नियमांमध्ये मोठे बदल

Goa Illegal Sand Mining: पोलीस आले-गेले, 'खेळ' सुरुच! म्हादई पात्रातून छुप्या मार्गाने रेती वाहतूक; प्रशासनाच्या भूमिकेवर ग्रामस्थ संतप्त

गोव्यातील खेड्यापाड्यात, दुर्गम भागात पोहोचणार स्टारलिंकचे हायस्पीड इंटरनेट; CM सावंतांची इलॉन मस्कच्या कंपनीसोबत चर्चा

SCROLL FOR NEXT