मोठ्या हल्ल्याचा कट फसला, हरियाणामध्ये चार संशयित खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक

हरियाणाच्या (Haryana) कर्नाल पोलिसांनी एका मोठ्या हल्ल्याचा कट उधळून लावला आहे.
Haryana
HaryanaDainik Gomantak
Published on
Updated on

हरियाणाच्या कर्नाल पोलिसांनी एका मोठ्या हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. पंजाबमध्ये राहणाऱ्या खलिस्तानी दहशतवादाशी आणि आयएसआयशी संबंधित असलेल्या चार संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी (Police) शस्त्रे आणि आरडीएक्ससह अटक केली आहे.

Haryana
BSF ला जम्मू आणि काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर सापडला संशयित बोगदा

मिळालेल्या माहितीनुसार, या चौघांना पहाटे 4 वाजता कर्नालच्या बस्तारा टोलनाक्यावरुन अटक करण्यात आली आहे. हे चौघे एका इनोव्हा कारमधून दिल्लीच्या दिशेने जात होते. अटक करण्यात आलेले संशयित दहशतवादी गुरप्रीत, भूपेंद्र अमनदीप आणि परविंदर सिंग हे पंजाबचे (Punjab) रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील हरविंदर सिंगचे चार साथीदार आहेत. कर्नाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांबाबत कर्नालचे एसपी म्हणाले की, ''दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा याने त्यांना आदेश दिले होते. चार संशयित दहशतवाद्यांना तेलंगणा आयईडी पाठवले जाणार होते, असे सांगण्यात येत आहे. त्यांचे लोकेशन पाकिस्तानातून (Pakistan) पाठवण्यात आले होते. यापूर्वी या लोकांनी दोन ठिकाणी आयईडीचा पुरवठा केला आहे. त्यांच्याविरुद्ध मधुबन पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास एसीपी उंद्री करणार आहेत.''

Haryana
पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली दखल

दरम्यान, त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, 31 काडतुसे आणि 3 लोखंडी कंटेनर जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच 1 लाख 30 हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. हे तिघेजण फिरोजपूरचे रहिवासी आहेत. तर 1 तरुण लुधियानाचा (Ludhiana) रहिवासी आहे. मुख्य आरोपीची तुरुंगात आणखी एका तरुणाशी भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com