Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: आरं याला कुणीतरी सांगा...! मगरींनी भरलेल्या नदीतून पठ्ठ्याचा होडी प्रवास; व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही थरथर कापाल

Crocodile River Viral Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

Manish Jadhav

Crocodile River Viral Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Midea) तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचेही मन हेलावून जाईल. व्हिडिओमध्ये, एक माणूस शेकडो मगरींनी भरलेल्या नदीत लाकडी होडीतून निर्भयपणे प्रवास करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर हे दृश्य एखाद्या भयपटापेक्षा कमी वाटत नाही. पण हे वास्तव आहे, जे लोकांना धास्ती भरवत आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

एक माणूस मगरींनी भरलेल्या नदीत होडी चालवतोय

व्हायरल व्हिडिओमध्ये एका नदीत जिथे शेकडो मगरी विहरताना दिसत आहेत. त्याचवेळी, एक माणूस नदीतील असंख्य मगरीतून वाट काढत होडी घेऊन जाताना दिसत आहे. व्हिडिओमधील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे होडी चालवणारा माणूस हे भयानक दृश्य पाहूनही घाबरला नाही. तो होडीवर पॅडलिंग करत मगरीमधून वाट काढत प्रवास करत आहे. मगरींच्या गराड्यातून होडी नेत असताना त्याला कसलेही भय वाटत नाही. हे संपूर्ण दृश्य इतके भयानक आहे की, कोणालाही त्याची भिती वाटेल. मात्र व्हिडिओमधील माणसाचे धाडस आणि बेफिकीरपणा पाहून लोक थक्क झाले आहेत.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या अकाउंटवरुन X या सोशल साइटवर शेअर करण्यात आला आहे. ही बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत, तो 5 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून 7700 लोकांनी लाईक केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "मला कोणी कितीही पैसे दिले तरी मी या नदीत कधीही होडीने जाणार नाही."

व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया

दुसरीकडे, या व्हायरल व्हिडिओवर लोकांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत. काहींनी त्या माणसाच्या धाडसाचे कौतुक केले, तर काहींनी त्याला मूर्ख म्हटले. एकाने कमेंट केली की, "या मगरी इतक्या शांत का आहेत? त्या काय खातात?" तर दुसऱ्याने लिहिले की, "हे धाडस नाही, हा वेडेपणा आहे. एक चूक आणि आयुष्य संपेल."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

SCROLL FOR NEXT