Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: 'रील'साठी पठ्ठ्यानं धावत्या ट्रेनमध्ये घातला आंघोळीचा घाट, प्रवासीही हैराण, अखेर पोलिसांनी पकडले; व्हिडिओ तूफान व्हायरल

Train Bathing Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ तूफान व्हायरल होतोय.

Manish Jadhav

Train Bathing Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ तूफान व्हायरल होतोय, जिथे एका व्यक्तीने धावत्या ट्रेनच्या दारात बादलीभर पाणी घेऊन चक्क आंघोळ केली. सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहताच रेल्वे पोलिसांनी संबंधित तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली.

धावत्या ट्रेनमध्ये पठ्ठ्याचा आंघोळ करताना व्हिडिओ

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण ट्रेनच्या दरवाज्याजवळ बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करताना दिसत आहे. त्याने डोक्याला शॅम्पू लावला आणि त्यानंतर त्याने मनसोक्त आंघोळीचा आनंद घेतला. मात्र त्याच्या या कृतीमुळे ट्रेनमध्ये पाणी सांडले, ज्यामुळे इतर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. व्हिडिओमध्ये एक महिला स्वतःला भिजण्यापासून वाचवण्यासाठी लांब उभी असल्याचे दिसत आहे, तर इतर प्रवासीही या कृत्याकडे आश्चर्याने पाहत आहेत. या घटनेची कोणीही तक्रार केली नसली तरी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर रेल्वे पोलिस सक्रिय झाले. उत्तर मध्य रेल्वेने सोशल मीडियावर माहिती दिली की, 'वीरांगना लक्ष्मीबाई झांसी स्टेशनवर ट्रेनमध्ये आंघोळ करण्याचा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे.'

प्रसिद्धीसाठी केली चूक

रेल्वे पोलिसांनी त्या व्यक्तीला पकडल्यानंतर त्याने प्रसिद्धीसाठी असे कृत्य केल्याचे मान्य केले. उत्तर मध्य रेल्वेने म्हटले की, "रील बनवून लोकप्रियता मिळवण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे या व्यक्तीने मान्य केले. आरपीएफ (RPF) त्याच्याविरुद्ध योग्य ती कार्यवाही करत आहे." उत्तर मध्य रेल्वेने सर्व प्रवाशांना आवाहन केले की, अयोग्य आणि इतर प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरणारे असे कोणतेही कृत्य करु नये.

तामिळनाडूमध्ये रील बनवताना एकाचा मृत्यू

त्याचवेळी, सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या नादात लोक आपला जीव धोक्यात घालत असल्याची एक दुःखद घटना तामिळनाडूतून समोर आली. तुतीकोरिन जिल्ह्यात मीलावित्तन रेल्वे स्टेशनवर रील बनवण्याच्या नादात 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. एन. अरुण नावाचा हा तरुण त्याच्या दोन मित्रांसह रील बनवण्यासाठी स्टेशनवर पोहोचला आणि ट्रेनच्या इंजिनवर चढला. याचवेळी अरुणचा हात ओव्हरहेड विजेच्या तारांना लागला. विजेचा जोरदार झटका बसल्याने अरुणचा जागीच मृत्यू झाला. त्याचे मित्र केविन आणि हरीश गंभीर जखमी झाले.

केवळ 'लाईक्स' आणि 'फॉलोअर्स' मिळवण्याच्या हव्यासापोटी तरुण मंडळी आपला जीव धोक्यात घालत असल्याने पालकांनी आणि प्रशासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: 12 नोव्हेंबरला मोठा बदल! चंद्र-केतू सिंह राशीत युती; 'या' 3 राशींच्या करिअर आणि कुटुंबात वाढणार अडचणी

IND vs SA Test: एकाचं त्रिशतक, तर 3 खेळाडूंची द्विशतकं...भारतीय फलंदाजांचा दबदबा; कसोटी मालिकेपूर्वी आफ्रिकेचे गोलंदाज टेन्शनमध्ये

'विवाह नोंदणी' आता कोणत्याही तालुक्यातून शक्य! CM सावंतांची मोठी घोषणा, 8 ते 10 दिवसांत सुविधा सुरू होणार

Transgender Ban: ऑलिम्पिकमध्ये ट्रान्सजेंडर महिलांना बंदी? पॅरिस स्पर्धेतील वादानंतर IOC लवकरच घेणार मोठा निर्णय; लागू होणार नवा नियम

Pooja Naik : "पोलिसांना थोडा वेळ द्या", CM सावंतांकडून 'नवीन FIR'चे आदेश; नोकरी घोटाळा प्रकरणी तपासाची दिशा बदलणार?

SCROLL FOR NEXT