Man arrested for posing as ISRO scientist And Claiming built Chandrayaan 3 Module. Dainik Gomantak
देश

"चांद्रयान 3 चे मॉड्यूल मीच बनवलेय", गुजरातचा थापाडा शिक्षक गजाआड

Chandrayaan 3: गुजरातमधील एका व्यक्तीने चांद्रयान-3 मोहिमेसाठी लँडर मॉड्यूल डिझाइन केल्याचा दावा केला होता. तसेच तो भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (ISRO) शास्त्रज्ञ असल्याचे भासवायचा.

Ashutosh Masgaunde

Gujarat Man arrested for posing as ISRO scientist And Claiming built Chandrayaan 3 Module:

गुजरातमधील एका व्यक्तीने चांद्रयान-3 चंद्र मोहिमेसाठी लँडर मॉड्यूल डिझाइन केल्याचा दावा केला होता. तसेच तो भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (ISRO) शास्त्रज्ञ म्हणून आपली ओळख सांगायचा.

या प्रकरणी एका व्यक्तीने पोलिसांकडे या व्यक्तीची वागणूक संशयास्पद असल्याची तक्रार केली होती. याचा पोलिसांनी तपास केला.

तपासामध्ये सर्व दावे खोटे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला गुजरातमधील सुरत शहरातून अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव मितुल त्रिवेदी असे आहे. सुरत शहर गुन्हे शाखेने आरोपींवर विविध कायद्यांंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सखोल चौकशीत असे दिसून आले की या व्यक्तीचा इस्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही. तसेच तो इस्रोचा कर्मचारी असल्याचा दावाही खोटा आहे.

या प्रकरणी आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले असून, पुढील चौकशी सुरू आहे.

विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी बनाव

अधिका-यांनी सांगितले की, आरोपी मितुल त्रिवेदी हा अंदाजे 30 वर्षांचा आहे आणि तो सुरत शहरातील तो चालवत असलेल्या कोचिंग क्लासेससाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी इस्रोचा शास्त्रज्ञ असल्याचे दाखवत असे. या व्यक्तीने इस्रोच्या पुढील प्रकल्पामध्ये सदस्य असल्याचे बनावट पत्रही तयार केले होते.

इस्त्रोने दावा नाकारला

अतिरिक्त पोलिस आयुक्त शरद सिंघल म्हणाले की, त्रिवेदी हे खाजगी शिक्षक आहे. तो आपल्या कोचिंग क्लासेसकडे अधिकाधिक विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी माध्यमांसमोर इस्रोचे शास्त्रज्ञ असल्याचे सांगायचा. आम्ही इस्रोशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, आरोपीने दाखवलेले पत्र प्रथमदर्शनी त्यांनी दिलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT