Accused Dainik Gomantak
देश

Delhi Crime: छावला सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी पुन्हा गजाआड, SC ने 3 महिन्यांपूर्वी...

Delhi Crime News: दिल्लीतील द्वारका सेक्टर-14 परिसरात एका ऑटोरिक्षा चालकाचा चाकूने वार करुन खून केल्याची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Delhi Crime: दिल्लीतील द्वारका सेक्टर-14 परिसरात एका ऑटोरिक्षा चालकाचा चाकूने वार करुन खून केल्याची घटना समोर आली आहे. हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 2012 च्या छावला सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातून अटक केलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एकाची सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली होती.

शनिवारी याबाबत माहिती देताना पोलीस (Police) अधिकाऱ्याने सांगितले की, विनोद व्यतिरिक्त पवन असे अन्य आरोपीचे नाव आहे. 26 जानेवारी रोजी मुनिरका येथील रहिवासी असलेल्या 44 वर्षीय अनार सिंग याची द्वारकाच्या सेक्टर-13 मध्ये चाकूने वार करुन हत्या करण्यात आली होती. त्याच्या मानेवर वार केले होते.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींच्या (Accused) चौकशीत समोर आले की, द्वारकाला पोहोचल्यावर आरोपींनी चालकाला लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु ऑटोचालकाने प्रतिकार केल्यावर त्यांनी त्याला धक्काबुक्की करुन पळ काढला.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विनोदची नुकतीच तुरुंगातून सुटका झाली आहे. छावला गँगरेप आणि खून प्रकरणात तो जवळपास 10 वर्षे तुरुंगात होता.

2012 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील छावला येथे 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या तीन जणांची निर्दोष मुक्तता केली. अपहरणानंतर तीन दिवसांनी मुलीचा विकृत मृतदेह सापडला होता. ही महिला गुरुग्रामच्या सायबर सिटी परिसरात काम करत होती आणि ती उत्तराखंडची रहिवासी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT