Mamata Banerjee vs BSF | Amit shah
Mamata Banerjee vs BSF | Amit shah  Dainik Gomantak
देश

Mamata Banerjee vs BSF: केंद्रीय गृहमंत्र्यांसमोरच 'बीएसएफ' अधिकाऱ्यांशी भांडू लागल्या ममतादिदी...

Akshay Nirmale

Mamata Banerjee vs BSF: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बीएसएफ अधिकाऱ्यांमध्ये शनिवारी कोलकाता येथे वाद झाला. विशेष म्हणजे, गृहमंत्री अमित शाह यांच्या समोरच हा वाद झाला. हावडा येथे पूर्व विभागीय समुपदेशनाच्या बैठकीत ही घटना घडली. बीएसएफचे कार्यक्षेत्र 50 किलोमीटरपर्यंत वाढविल्यावरून ममता बॅनर्जी संतापल्या आहेत. यामुळे राज्यातील सर्वसामान्यांना त्रास होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

नवीन कायद्यानुसार केंद्र सरकारने बीएसएफला आंतरराष्ट्रीय सीमेपासून 50 किलोमीटरपर्यंतच्या परिसरात कारवाई करण्याचे अधिकार दिले. यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाची किंवा वॉरंटची गरज भासणार नाही. पूर्वी बीएसएफ केवळ 15 किलोमीटर क्षेत्रात कारवाईचे अधिकार होते. यावरून अनेक राज्य सरकारांना अडचण निर्माण झाली आहे. पण ममतादिदींच्या आजच्या वर्तनाने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. ममता बॅनर्जी या कुणाची भीडभाड न ठेवता बिनधास्त बोलत असतात. त्याचाच प्रत्यय आजच्या त्यांच्या वर्तनाने आला. त्यांनी अचानक बोलायला सुरूवात केल्यानंतर बीएसएफचे अधिकारी मात्र चपापले.

यापुर्वी मे 2022 मध्ये ममता म्हणाल्या होत्या की, केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे बीएसएफ आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गायींची तस्करी करते आणि लोकांना मारून त्यांचे मृतदेह बांगलादेशात फेकते, पण त्यासाठी बंगाल पोलिसांना दोषी ठरवले जाते. म्हणूनच मी राज्य पोलिसांना बीएसएफला रोखण्यास सांगितले आहे. डिसेंबरमध्ये पश्चिम बंगाल विधानसभेनेही बीएसएफच्या अधिकारक्षेत्राचा विस्तार करण्याविरोधात ठराव मंजूर केला होता.

केंद्राने ऑक्टोबर 2021 मध्ये बीएसएफच्या अधिकारक्षेत्रात वाढ केली होती. बीएसएफ अधिकाऱ्यांना पश्चिम बंगाल, पंजाब आणि आसाममध्ये देशाच्या सीमेपासून 50 किलोमीटरपर्यंत शोध, अटक आणि जप्त करण्याची परवानगी देण्यात आली. या निर्णयामुळे पंजाबमध्ये राजकीय वाद निर्माण झाला होता. यापूर्वी पंजाबमधील कोणत्याही कारवाईत बीएसएफ स्थानिक पोलिसांच्या मदतीने काम करत असे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्णयाचा देशातील 12 राज्यांवर परिणाम झाला. यामध्ये गुजरात, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय, जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लडाख यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT