India-China: चिनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीनंतर मोठे केंद्रीय मंत्री पोहोचले तवांगला, शेअर केले फोटो

भारतीय लष्कराच्या शूर सैनिकांमुळे हा परिसर पूर्णपणे सुरक्षित आहे.
India-China
India-ChinaDainik Gomantak

भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये तवांग भागात झटापट झाली. त्यांनंतर दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, या संघर्षानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी (17 डिसेंबर) तवांगच्या यांगत्से प्रदेशाला भेट दिली. किरेन रिजिजू म्हणाले, "भारतीय लष्कराच्या शूर सैनिकांमुळे हा परिसर पूर्णपणे सुरक्षित आहे."

India-China
MVA Morcha Mumbai: महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा; तिन्ही पक्षाच्या मोठ्या नेत्यांचा सहभाग

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "राहुल गांधी केवळ भारतीय लष्कराचाच अपमान करत नाहीत, तर देशाच्या प्रतिमेलाही मलिन करत आहेत. हे फक्त काँग्रेस पक्षासाठीच अडचणीचे नाहीत, तर त्यांच्यासाठी मोठा पेचही आहे. "आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे." किरेन रिजिजू यांनी ट्विटरवर भारतीय जवानांसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.

India-China
Online Payment Fraud: ऑनलाइन फसवणूक झाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर माहिती

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चीन युद्धाच्या तयारीत असून सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा दावा त्यांनी केला होता. ‘मोदी गाढ झोपले आहेत आणि परिस्थिती स्वीकारायला तयार नाहीत’, असेही राहुल गांधी म्हणाले होते. चीनने भारताचा 2000 चौरस किलोमीटरचा भूभाग बळकावला आहे. 20 भारतीय सैनिक मारले आहेत आणि अरुणाचल प्रदेशात आमच्या जवानांना मारहाण करत असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com