Mamata Banerjee Dainik Gomantak
देश

'अग्निवीरांच्या निवृत्तीचे वय 65 वर्षे करा', ममता बॅनर्जींनी मोदी सरकारकडे केली मागणी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला 'अग्निवीर'चे निवृत्तीचे वय 65 वर्षे करावे अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला 'अग्निवीर'चे निवृत्तीचे वय 65 वर्षे करावे अशी मागणी केली आहे. चार वर्षांत त्यांची सेवा संपुष्टात आल्यास तरुणांचे भवितव्य धोक्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, चार वर्षांनी हे सैनिक काय करतील? त्यांच्या भविष्याचे काय असणार?'

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) पुढे म्हणाल्या, रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करणे आपले ध्येय आहे. केंद्र सरकारने (Central Government) अग्निवीरांच्या निवृत्तीचे वय 65 वर्षे करावे'.

दरम्यान, या योजनेंतर्गत 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना केवळ चार वर्षांसाठी सैन्य दलात भरती करण्यात येणार आहे. एकूण भरती झालेल्या तरुणांपैकी केवळ 25 टक्के तरुणांना 15 वर्षांहून अधिक काळ सशस्त्र दलात नियमितपणे नियुक्त केले जाईल. 2022 साठी भरतीसाठी उच्च वयोमर्यादा 23 वर्षे करण्यात आली आहे.

बॅनर्जी यांनी यापूर्वी दावा केला होता की, भाजप (BJP) या योजनेचा वापर आपला "सशस्त्र केडर बेस" तयार करण्यासाठी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coconut Tree: पोर्तुगीज येण्याआधीपासून गोव्यात असलेला, 80 देशांत लागवड होणारा कल्पवृक्ष 'नारळ'

वीज कोसळून कर्नाटकच्या व्यक्तीचा गोव्यात मृत्यू? कोलवा येथे भाड्याच्या खोली बाहेर आढळला मृतदेह

अग्रलेख: भारतात पावसाच्या एका तडाख्यातच डांबर, खडी, सिमेंट अदृश्य का होऊन जाते?

Goa Today's News Live: फोंड्यात थंड पेयाच्या सीलबंद बाटलीत आढळली मिरची पूड

मडगावात सुलभ शौचालयाजवळ आढळला भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह

SCROLL FOR NEXT