Mallikarjun Kharge Dainik Gomantak
देश

Mallikarjun Kharge On PM Modi: 'तुम्हाला रावणासारखी 100 डोकी....,' PM मोदींवर खर्गेंनी साधला निशाणा

Mallikarjun Kharge statement: काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावरुन गदारोळ झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Mallikarjun Kharge Called PM Modi Ravana: काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावरुन गदारोळ झाला आहे. गुजरातमधील एका निवडणूक रॅलीदरम्यान खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. खर्गे म्हणाले की, "तुम्हाला रावणसारखी 100 डोकी आहेत का?" यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार प्रहार करत काँग्रेस पक्षाने गुजरातच्या सुपुत्राचा अपमान केला असल्याचे म्हटले. या वक्तव्यानंतर भाजपने गुजरातच्या जनतेला काँग्रेसला धडा शिकवण्याचे आवाहन केले आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांचे वादग्रस्त विधान

मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) पुढे म्हणाले की, 'ते नेहमीच स्वत:बद्दल बोलतात. त्यांना दुसरे कोणी दिसतच नाही. निवडणुकीत मोदी केवळ स्वत:च्या नावावर मते मागतात. मात्र निवडणुकीत उमेदवाराचा चेहरा बघा. त्यांना रावणसारखी 100 डोकी आहेत का?' या वक्तव्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी काँग्रेस (Congress) आणि खर्गे यांच्यावर निशाणा साधला.

पंतप्रधानांना रावण कसे म्हणता येईल : भाजप

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्यावर भाजप (BJP) प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, 'काँग्रेसने पंतप्रधानांचा अपमान केला आहे. गुजरातच्या सुपुत्राचा अपमान झाला आहे, सोनिया गांधींनी पंतप्रधानांना 'मौत का सौदागर' म्हटले होते. पंतप्रधानांना तुम्ही रावण कसे म्हणू शकता.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT