Dainik Gomantak
Dainik Gomantak
देश

Rajasthan: भारतीय गुप्तचर यंत्रणेची मोठी कारवाई, स्वातंत्र्य दिनापूर्वी 2 पाकिस्तानी हेरांना अटक

दैनिक गोमन्तक

Rajasthan Intelligence: स्वातंत्र्य दिनापूर्वी राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली दोघांना अटक केली आहे. भिलवाडा येथील रहिवासी नारायण लाल गद्री (27) आणि जयपूर येथील रहिवासी कुलदीप सिंग शेखावत (24) अशी आरोपींची नावे आहेत. गुप्तचर यंत्रणांनी संयुक्तपणे मिळून हि कारवाई केली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, नारायण लालने एका पाकिस्तानी हँडलर्सना अनेक कंपन्यांचे सिमकार्ड दिले होते, ज्याचा वापर पाकिस्तानी हँडलर्स सोशल मीडिया अकाउंट चालवण्यासाठी करत होते. दुसरीकडे कुलदीप सिंह शेखावत हा पाली येथील एका दारूच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करायचा. तो एका पाकिस्तानी महिला हँडलरच्या संपर्कात होता.

गुप्तचर संस्थेचे महासंचालक उमेश मिश्रा यांनी सांगितले की, कुलदीप शेखावत लष्कराच्या जवानांशी सोशल मीडियावर मैत्री केल्यानंतर त्यांची गोपनीय माहिती घेत असे. हेरगिरीसाठी आणि पाकिस्तानी हस्तकांना मदत करण्यासाठी दोघांनाही पैसे मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींविरुद्ध आयपीसी कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे सामील

नारायण लालने राजस्थान पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले की, त्याचे पाचवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. उदरनिर्वाहासाठी गाडी चालवणे, घरोघरी कुल्फी विकणे, शेळ्या पाळणे, भजन गाणे अशी अनेक कामे केली. या वर्षाच्या सुरुवातीला नारायण लालला फेसबुकवर एक लिंक सापडली होती. याद्वारे तो एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील झाला ज्यावर अश्लील साहित्य दिले जात होते. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पाकिस्तानसह अनेक देशांतील 250 हून अधिक सदस्य होते. मात्र, आरोपी नारायण लालने दावा केला की तो एका आठवड्यानंतरच या गटातून बाहेर पडला होता.

पाकिस्तानात नेण्याची योजना होती

चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, व्हॉट्सअॅप ग्रुप सोडल्यानंतर एका व्यक्तीने त्याच्याशी संपर्क साधला. जो "+92" म्हणजेच पाकिस्तानी नंबर वापरत होता. त्याने गटातून बाहेर पडण्याचे कारण विचारले. तसेच त्याचे नाव अनिल असे सांगितले. दोघांमध्ये संवाद सुरूच होता. काही दिवसांनंतर अनिलने नारायण लालची ओळख साहिल या पाकिस्तानी इंटेलिजेंस ऑपरेटिव्हशी (PIO) करून दिली, जो भारताच्या नंबरवरून व्हॉट्सअॅप चालवत होता, त्याने त्याला सांगितले की तो दिल्लीत राहतो. पीआयओ साहिलने नारायण लालला पाकिस्तानात जाण्यास सांगितले. तसेच या ट्रिपचा संपूर्ण खर्च तो उचलणार असल्याचे सांगितले. नारायण लालने त्यांचा पासपोर्ट आणि व्हिसा बनवण्यासाठी तयांचे आधार कार्ड, डायव्हिंग लायसन्स, पॅन कार्डची माहिती पीआयओसोबत शेअर केली.

नारायण लालने सिमकार्ड विकत घेतले

पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी अनिल आणि साहिल नारायणला भारतीय सिमकार्डची गरज होती. त्या बदल्यात त्याला पैसे दिले जातील असे सांगितले गेले. नारायण लालने त्याच्या नावावर दोन सिमकार्ड खरेदी केले. नारायण लालने हे सिम पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हने दिलेल्या पत्त्यावर पाठवले होते. यानंतर नारायण लालने पीआयओला आणखी तीन सिम पाठवले. त्यासाठी त्यांना 5 हजार रुपये मिळाले.

कन्हैयालालच्या हत्येनंतर प्रसिद्ध झालेला व्हिडिओ पाहण्यास सांगितले

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने नारायणलालला लष्करी क्षेत्रात प्रवेश करण्यास, लष्करातील जवानांशी मैत्री करण्यास, लष्करी तळांचे फोटो आणि व्हिडिओ पाठविण्यास सांगितले होते. एवढेच नाही तर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने त्याला उदयपूरमध्ये कन्हैयालालच्या हत्येनंतर घौस आणि रियाझने जारी केलेला व्हिडिओ पाहण्यास सांगितले. पीआयओने नारायण लालकडे उदयपूर कॅन्टोन्मेंटला लागून असलेल्या शॉपिंग स्पेसची रेकी करण्याचे कामही सोपवले होते, जेणेकरून ते तिथे फोटो कॉपी स्टॉल लावू शकतील. या कामासाठी त्यांनी नारायण लालला दोन ते तीन हजार रुपये पाठवले होते. एवढेच नाही तर त्यासाठी चार ते पाच लाख रुपये देण्याचे आश्वासनही दिले होते.

गुगल मॅपवरून खरेदीचे ठिकाण पाठवले

नारायण लालने उदयपूर कॅन्टोन्मेंटला लागून असलेल्या भागाला भेट दिली. एक दुकान शॉर्टलिस्ट केले, त्यानंतर गुगल मॅपद्वारे दुकानाचे लोकेशन PIOला शेअर केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT