Rakesh Jhunjhunwala यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन, PM मोदींनी व्यक्त केला शोक

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले.
Rakesh Jhunjhunwala and PM Modi
Rakesh Jhunjhunwala and PM ModiTwitter
Published on
Updated on

Rakesh Jhunjhunwala Death: शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 6.45 च्या सुमारास राकेश झुनझुनवाला यांना रुग्णालयात आणण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. झुनझुनवाला अनेक आरोग्य समस्यांनी त्रस्त होते आणि शेवटचे आठवडाभरापूर्वी आकासा एअरच्या लॉन्चिंगवेळी दिसले होते.

Rakesh Jhunjhunwala and PM Modi
Akasa Air: राकेश झुनझुनवाला यांच्या 'अकासा एअर'ची पहिली हवाई यात्रा

त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करताना लिहिले, 'राकेश झुनझुनवाला अजिंक्य होते. आर्थिक जगतात त्यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांचे जाणे दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना. ओम शांती.' स्टॉक मार्केटचे बिग बुल म्हणून ओळखल्या जाणार्‍या दिग्गज गुंतवणूकदाराची एकूण संपत्ती सुमारे 5.5 अब्ज डॉलर आहे.

झुनझुनवाला मुंबईत राजस्थानी कुटुंबात मोठे झाले आहे. त्यांचे वडील आयकर आयुक्त म्हणून काम करत होते. त्यांनी सिडनहॅम कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेतला. जेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना आपल्या मित्राशी मार्केटमध्ये बोलताना ऐकले तेव्हा त्यांना शेअर मार्केटमध्ये रस निर्माण झाला. त्यांच्या वडिलांनी त्यांना या क्षेत्रात येण्यासाठी मार्गदर्शन केले, परंतु त्यांनी कधीही गुंतवणुकीसाठी पैसे दिले नाहीत आणि मित्रांनाही पैसे मागण्यास नकार दिला.

Rakesh Jhunjhunwala and PM Modi
Rakesh Jhunjhunwala: स्टॉक मार्केट किंग राकेश झुनझुनवाला काळाच्या पडद्याआड

यानंतर झुनझुनवाला यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील बचतीच्या रकमेतून बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. 1985 मध्ये त्यांनी 5000 रुपयांपासून सुरुवात केली आणि आज त्यांची गुंतवणूक 11000 कोटींपर्यंत वाढली आहे. त्यांना 'भारताचा बीग बुल' आणि 'बुल मार्केटचा राजा' म्हणून ओळखले जात होते. त्यांचा पहिला मोठा नफा 1986 मध्ये 5 लाख होता. 1986 ते 1989 या काळात त्यांना सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचा नफा झाला. त्यांनी 1986 मध्ये टाटा टीचे 5000 शेअर्स 43 रुपयांना विकत घेतले जे तीन महिन्यांत वाढून 143 रुपये झाले आणि 3 पट नफा झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com