Ghazipur Accident Dainik Gomantak
देश

Ghazipur Accident: उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये एक मोठी दुर्घटना, हाय टेंशन वायर बसवर पडल्याने आग; 6 जणांचा मृत्यू

Ghazipur Accident: उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. हाय टेंशन वायर बसवर पडल्याने आग लागली.

Manish Jadhav

Ghazipur Accident: उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. हाय टेंशन वायर बसवर पडल्याने आग लागली. यामुळे बसमधील अनेकजण जिवंत जळाले. मिळालेल्या माहितीनुसार, 25 लोक अपघाताचे बळी ठरले आहेत.

दरम्यान, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. बस एका लग्न समारंभातून परतत होती. मरदह येथे हा अपघात झाला. जिल्ह्याचे डीएम आणि एसपी यांच्यासह अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

कोपागंज येथून लग्नाचे वऱ्हाडी घेऊन बस मरदह येथील महाहर धाम येथे जात होती. याचदरम्यान, कच्च्या रस्त्यावरुन जाणाऱ्या या बसचा अपघात झाला. बसमध्ये 35 हून अधिक लोक होते.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्य वेगाने पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पीडितांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. अनेकांना मरदह येथील रुग्णालयातही भरती केले जात आहे.

अपघातानंतर (Accident) हाय टेंशन वायर आणि विजेचा प्रवाह यामुळे बस जळताना लोक दुरुनच पाहत राहिले. करंट बंद केल्याची माहिती वीज विभागाला देण्यात आली. करंट बद असल्याची खात्री झाल्यानंतरच लोक बसजवळ पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवता आले.

वाराणसीचे डीआयजी ओपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, वऱ्हाडींनी भरलेली बस हाय टेंशन वायरला धडकल्याने अपघात झाला. गाझीपूरचे (Ghazipur) डीएम आणि एसपी घटनास्थळी असून ते मदतकार्यात गुंतले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मऊच्या खिरीया काझाहून वऱ्हाडी गाझीपूरमधील मरदहकडे निघाली होती. बांधकाम सुरु असलेल्या कच्च्या रस्त्यावरुन बस मंदिराकडे निघाली होती. याचदरम्यान, 11 हजार व्होल्टच्या हाय टेंशन वायरच्या खाली बस आली.

बसच्या छताला वायरचा स्पर्श होताच ठिणग्या उडाल्या. याचा आवाज ऐकून बसमध्ये बसलेले लोक ओरडले. काहींनी उड्या मारल्या तर काही बसमध्येच अडकले. मात्र, आजूबाजूचे लोक काही करण्याआधीच बसने पेट घेतला. घटनास्थळावरील लोकांनी तात्काळ अधिकाऱ्यांना अपघाताविषयी माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT