Uttar Pradesh: लखनऊ जिल्हा कारागृहात 36 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह; आरोग्य विभागात खळबळ!

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लखनऊ जिल्हा कारागृहातील 36 नवीन कैद्यांमध्ये एचआयव्ही संसर्गाची पुष्टी झाली आहे.
Jail
JailDainik Gomantak

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लखनऊ जिल्हा कारागृहातील 36 नवीन कैद्यांमध्ये एचआयव्ही संसर्गाची पुष्टी झाली आहे. त्यामुळे कारागृह प्रशासन आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली. बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. डॉक्टरांचे पथक बाधितांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. संसर्ग पसरण्याची कारणे शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एड्स नियंत्रण संस्थेच्या सूचनेवरुन आरोग्य विभागाने डिसेंबर 2023 मध्ये जिल्हा कारागृहात एचआयव्ही तपासणी केली होती. यामध्ये 3 हजारांहून अधिक कैद्यांची तपासणी करण्यात आली होती.

दरम्यान, तपासणीत 36 नवीन कैद्यांमध्ये एचआयव्ही संसर्गाची पुष्टी झाली. कारागृहात यापूर्वीच 11 रुग्णांना संसर्ग झाला होता. सध्या बाधितांची संख्या 47 वर पोहोचली आहे. केजीएमयूच्या अँटी रेट्रो व्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रातून संक्रमित लोकांना औषधे दिली जात आहेत. कैद्यांना एचआयव्हीची लागण कशी झाली? याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बाधितांचे समुपदेशन केले जात आहे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

Jail
Uttar Pradesh Crime: धक्कादायक! चहा मिळण्यास उशीर झाल्याने पतीने तलवारीने केली पत्नीची हत्या

यूपी एड्स कंट्रोल सोसायटीचे सहसंचालक डॉ. रमेश म्हणाले की, कारागृहात तपासाची विशेष मोहीम राबवण्यात आली. ज्यामध्ये 36 नवीन कैद्यांमध्ये एचआयव्ही संसर्गाची पुष्टी झाली. तुरुंगातील 11 जणांना आधीच संसर्ग झाला होता. सर्व बाधितांना औषधे दिली जात आहेत. डॉक्टरांचे पथक रुग्णांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com