Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: ओडिशा दुर्घटनेनंतर छत्तीसगडमध्ये एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्या दोन ट्रेन, रेल्वे प्रशासन म्हणते...

छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये एकाच ट्रॅकवर दोन गाड्या समोरासमोर आल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर आता छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये एकाच ट्रॅकवर दोन गाड्या समोरासमोर आल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या ट्रॅकवर लोकल ट्रेन उभी आहे, त्याच ट्रॅकवर पलीकडून एक ट्रेन येताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील ही घटना आहे.

याच रेल्वे मार्गावर पॅसेंजर ट्रेन आणि गुड्स ट्रेन आली होती मात्र ती लांब गेल्यावर थांबवण्यात आली होती. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने रेल्वेकडून स्पष्टीकरण जारी करण्यात आले आहे.

जयराम नगर आणि बिलासपूर सेक्शन दरम्यान समोरासमोर येणाऱ्या ट्रेनचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, शनिवारी संध्याकाळी लोकल पॅसेंजर ट्रेन (MEMU) आणि मालगाडी बिलासपूर जिल्ह्यातील जयरामनगर आणि जांजगीर-चंपा जिल्ह्यातील कोटमिसोनार दरम्यान एकाच रुळावर आली.

मेमू ट्रेन कोरबा येथे येत होती, दरम्यान, दोन्ही ट्रेन वेळीच थांबवण्यात आल्या. आणि मोठा अपघात होता होता टळला.

व्हिडिओ समोर आल्यानंतर रेल्वेच्या वतीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 'एकाच मार्गावर एकापेक्षा जास्त ट्रेनचे सुरक्षित संचलन होण्यासाठी सिग्नलचा आधार घेतला जातो. रेल्वेच्या विविध विभागातील स्वयंचलित सिग्नलिंग ब्लॉक विभागात या नियमानुसार गाड्या चालवल्या जातात. असे रेल्वने म्हटले आहे.

'प्रवाशांमध्ये गैरसमज पसरला की एकाच ट्रॅकवर दोन गाड्या समोरासमोर आल्या आणि त्यांच्यात टक्कर झाली असती, परंतु असे होत नाही.' असेही व्हायरल व्हिडिओबाबत बोलताना रेल्वेने म्हटले आहे.

ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्सप्रेस, बंगळुरू - हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि मालगाडी यांचा एकमेकांना धडकून मोठा अपघात झाला. या अपघातात मोठी जीवितहानी झाली.

समोर आलेल्या आकड्यांनुसार या अपघातात मृतांची संख्या 275 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर, 1000 हून अधिक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा गेल्या 15 ते 20 वर्षांतील सर्वात मोठ्या रेल्वे अपघातांपैकी एक असल्याचे सांगितले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan In Goa: गूळ-खोबऱ्याच्या पातोळ्या, तोणियाची भाजी, ब्राह्मीची चटणी; श्रावणातला आहार

Arshdeep Singh: बुमराह-चहलला जमलं नाही, ते अर्शदीप करणार! T20 मध्ये करणार शतक, 'हा' पराक्रम करणारा पहिला गोलंदाज बनेल

Canacona: ..समुद्र राजा आता शांत हो! मच्छीमार महिलांकडून काणकोणात समुद्रपूजन; समुद्रात सोडला नारळ

Goa Athletics: साक्षी, राणी, निकेतचा ‘डबल’ धमाका! राज्य ॲथलेटिकमध्ये पुरुषांत मोझेस, अनंतकृष्णन यांच्यात चढाओढ

Horoscope: सावध राहा! अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे 'या' राशीच्या लोकांना पडेल महागात

SCROLL FOR NEXT