Colombia Plane Crash
Colombia Plane Crash

अ‍ॅमेझॉनच्या जंगलात कोसळले विमान, बातमी आली सर्व ठार पण... 40 दिवसांनंतर चमत्कार झाला

कोलंबियाच्या कॅक्वेटा आणि ग्वाविअर प्रांतांच्या सीमेजवळ लष्करी बचाव मोहिमेत या मुलांची सुटका करण्यात आली.
Published on

Colombia Plane Crash: कोलंबियातील अ‍ॅमेझॉन जंगलात सुमारे 40 दिवसांपूर्वी विमान कोसळले होते. विमानातील सर्व लोक ठार झाल्याची बातमी समोर आली. दरम्यान, या विमान अपघातातील चार मुले जिवंत सापडल्याची आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.

या बातमीने पीडित कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी चारही मुले जिवंत असल्याचे सांगितले आहे.

(Four children found alive in Amazon after 40 days)

कोलंबियाच्या कॅक्वेटा आणि ग्वाविअर प्रांतांच्या सीमेजवळ लष्करी बचाव मोहिमेत या मुलांची सुटका करण्यात आली. 1 मे रोजी अ‍ॅमेझॉन प्रांतातील सॅन जोस डेल शहरात विमानाचे इंजिन बिघडल्याने सात जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले.

यामध्ये पायलट आणि या मुलांची आई मॅग्डालेना यांच्यासह तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह विमानात सापडले होते. मात्र, आता ही 13, 9, 4 वर्षे आणि 11 महिने वयाची चार मुले जिवंत सापडली आहेत.

Colombia Plane Crash
कोट्यवधींचा मालक हळदीच्या अंगाने घराबाहेर गेला; लग्नाच्यापूर्वी प्रायव्हेट पार्ट कापून तरूणाची हत्या

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, या वृत्ताची पुष्टी न झाल्याने राष्ट्रपतींनी ट्विट डिलीट केले. यापूर्वी, देशाच्या सशस्त्र दलाने शोध मोहीम तीव्र करण्यात आल्याचे सांगितले होते. बचाव कर्मचार्‍यांना त्या लोकांनी बनवलेला तात्पुरता निवारा सापडला.

मुले जिवंत असल्याची बातमी ऐकून खूप आनंद झाला असे या घटनेतून वाचलेल्या मुलांचे आजोबा नरसिजो मुकुटुय यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले. कोलंबियाच्या सैन्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये जंगलाच्या मध्यभागी चार मुलांसह सैनिकांचा एक ग्रुप दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com