Maitri Patel India's youngest commercial pilot  Dainik Gomantak
देश

मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याच्या लेकीची गगन भरारी; 19 व्या वर्षी झाली पायलट

मैत्री पटेल (Maitri Patel) हिने अमेरिकेत (USA) प्रशिक्षण घेऊन भारतातील सर्वात तरुण महिला व्यावसायिक वैमानिक होण्याचा मान मिळवला आहे.

दैनिक गोमन्तक

गुजरातच्या (Gujrat) ओलपाड (Olpad) भागातील शेतकरी कुटुंबाची मुलगी मैत्री पटेल (Maitri Patel) हिने अमेरिकेत (USA) प्रशिक्षण घेऊन भारतातील सर्वात तरुण महिला व्यावसायिक वैमानिक होण्याचा मान मिळवला आहे. मंगळवारी मैत्री सुरतला (Surat Girl) परतली तेव्हा तिचे मित्र आणि परिचितांनी तिचे स्वागत केले आहे .

मैत्रीने सांगितले की जेव्हा सुरतहून दिल्लीला विमानसेवा सुरू झाली तेव्हा ती पहिल्यांदा विमानात चढली होती. त्या काळात तिच्या वडिलांनी तिला पायलट होण्यास सांगितले होते, तेव्हापासून तिला पायलट बनण्याची इच्छा होती. सुरत येथील एका खासगी शाळेत शिकत असताना त्यांनी तिचे मुंबईत प्रशिक्षण सुरू केले होते. (Maitri Patel India's youngest commercial pilot)

शाळा संपल्यानंतर ती अमेरिकेत प्रशिक्षणासाठी गेली. सामान्यतः हे प्रशिक्षण 18 महिन्यांचे असते, गरज पडल्यास ते सहा महिन्यांपर्यंत वाढवता येते. परंतु तिने 11 महिन्यांतच प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आणि परवाना मिळवला. भारतात व्यावसायिक विमान उड्डाण करण्यासाठी, तिला येथे पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि भारतीय परवाना घ्यावा लागेल.

मैत्री म्हणाली की भविष्यात तिला कॅप्टन बनून जंबो जेट विमान उडवायचे आहे. मैत्रीचे वडील कांतीभाई पटेल हे शेतकरी आहेत, मूळचे ओलपाड भागातील शेरडी गावचे आणि शहरात घोरडौर रोड परिसरात राहणारे. तर तिची आई सुरत महानगरपालिकेत कार्यरत आहे.त्यांचा दावा आहे की मैत्री ही भारतातील सर्वात तरुण व्यावसायिक पायलट आहे, त्याआधी जम्मू-काश्मीरमधील 25 वर्षीय आयशा होती. विशेष म्हणजे भारतामध्ये संपूर्ण जगात महिला वैमानिकांची संख्या सर्वाधिक आहे.

आयुष्यात स्वत:ची वेगळी ओळख बनवण्याचं स्वप्न मैत्रीनं पाहिलं आहे. एक काळ होता जेव्हा मैत्रीच्या वडिलांकडे मुलीला पायलट प्रशिक्षण देण्यासाठी पैसे नव्हते. अनेक बँकांकडे कर्जासाठी हात पसरले परंतु सगळीकडे निराशा आली. परंतु कुठल्याही बँकेने त्यांना कर्ज देण्यास नकार दिला.अखेर हतबल झालेल्या बापानं शेतजमीन विकून मुलीच्या पायलट प्रशिक्षणासाठी पैसे भरले. आणि आपल्या लेकीचे स्वप्न पूर्ण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT