दिल्ली: लोकसभेमध्ये (Loksabha) आक्रमकपणे आपली भूमिका मांडणाऱ्या टीएमसीच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची सातत्याने चर्चा असते. आज देखील त्यांनी आपला हाच आक्रमकपणा कायम ठेवत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मात्र या भाषणादरम्यान व्यक्तय आणल्याबद्दल त्यांनी थेट लोकसभा अध्यक्षांवरच ताशेरे ओढले आणि आपली भूमिका आक्रमकपणे सभागृहापुढे मांडली.
खासदार महुआ मोईत्रा आज लोकसभेमध्ये भाषण करत होत्या. मात्र या दरम्यान त्यांचा रुद्रावतार पाहून अध्यक्षस्थानी असलेल्या रमा देवी यांनी त्यांना थोडं शांततेत बोला म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. इतका राग चांगला नाही, असे अध्यक्षांनी त्यांना सांगितले. मात्र त्यानंतरही त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आपले भाषण सुरुच ठेवले. त्यानंतर त्यांनी भाषणादरम्यान व्यक्तय आणल्याबद्दल ट्विटरवरुन थेट अध्यक्षांनाच फटकारले.
महुआ यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना फटकारताना म्हटलं आहे की, "मला थांबवणारे आणि मला सल्ला देणारे अध्यक्ष कोण आहेत? तुम्ही मला केवळ नियमांच्याबाबतीत सांगु शकता. मी काय बोलायचं आणि कसं बोलायचं यावर नाही. तुम्ही काही लोकसभा नियमावलीच्या मॉरल सायन्सच्या शिक्षिका नाही. याशिवाय अध्यक्षांमुळे माझ्या भाषणाला मर्यादा आल्या, असाही आरोप त्यांनी केला आहे.
विरोधकांनी एकत्र येण्याची गरज
विरोधी पक्षानं उगाचच कोणत्याही गोष्टीचा बाऊ करु नये. विरोध करताना आपल्याला आणखी एकत्रित होण्याची गरज आहे. आता आपल्याला येत्या काळात एकत्र यावं लागेल. भाजप तर पूर्ण ताकद लावून 50 जागांवर विजयी होते. आणि आपल्याकडे एकुण जागा 200 जागा आहेत, असे म्हणत मोईत्रा यांनी विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
महुआ मोईत्रा यांनी या भाषणादरम्यान संसदेत सावरकरांपासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंतच्या स्वातंत्र्यवीरांचा उल्लेख करुन सरकारला घेरले. सावरकरांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून बहाल करण्यासाठी त्यांनी लिहिलेला माफीनामा राजकीय मास्टरस्ट्रोक म्हणून चित्रित केला जात आहे, असेही टीएमसी खासदार महुआ म्हणाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.