Mulayam Singh Yadav Dainik Gomantak
देश

Mulayam Singh Yadav यांना मरणोत्तर 'भारतरत्न' द्या, काँग्रेस नेत्याने केली मागणी

Congress Leader: समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Mulayam Singh Yadav: महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) वंचित घटकांच्या वेदना समजून त्यांच्यासाठी लढले. मुलायम सिंह यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. करोडो लोकांच्या भावनांचा आदर करत त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेस (Congress) नेत्याने केली आहे.

तसेच, मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून मुलायमसिंह यादव यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) बलियाचे खासदार वीरेंद्र सिंह यांनी गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांच्या स्मरणार्थ सभागृह बांधण्यासाठी त्यांच्या खासदार निधीतून 25 लाख रुपये मंजूर केले होते.

दुसरीकडे, प्रस्तावित सभागृह बलिया जिल्हा न्यायालय परिसरात बांधले जाणार असून त्याला ‘धरतीपुत्र मुलायम सिंह यादव संवाद भवन’ असे नाव देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणूनही काम पाहिले होते. लोक त्यांना प्रेमाने ‘नेताजी’ म्हणत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

Crime News: त्रिकोणी प्रेमाचा रक्तरंजित शेवट: गर्भवती महिलेची चाकूने वार करून हत्या, खुनी आधीचा लिव्ह-इन पार्टनर, नंतर पतीने खुनीचा काढला काटा

Horoscope: हा आठवडा आव्हानात्मक! 'या' 3 राशींसाठी कामावर सावधगिरी आवश्यक, अन्यथा नुकसानं पक्कं

"माझे वडील वाचले, कारण रवी नाईक!" - मंत्री विश्वजीत राणे भावूक; Watch Video

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

SCROLL FOR NEXT