Bhupesh Baghel |Chief minister of Chhattisgarh 
देश

महादेव बेटिंग ॲप प्रमोटर्सने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना दिले 508 कोटी रुपये; ED चा खळबळजनक आरोप

महादेव बेटिंग ॲपवर बेकायदा सट्टेबाजीच्या माध्यमातून 5,000 कोटींचा घोटाळा झाल्याची चर्चा आहे.

Pramod Yadav

Mahadev Betting App: महादेव बेटिंग ॲप प्रमोटर्सकडून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आत्तापर्यंत तब्बल 508 कोटी रुपये दिले असल्याचा खळबळजनक आरोप अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने करण्यात आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या याबाबत माहिती दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

महादेव बेटिंग ॲप गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले आहे. बेकायदा सट्टेबाजीच्या माध्यमातून 5,000 कोटींचा घोटाळा झाल्याची चर्चा आहे.

महादेव बेटिंग ॲप कंपनीवर बेकायदेशीर बेटिंग वेबसाइट्सना नवीन युझर्स पुरवणे, बेनामी बँक खाती चालवणे, निधीचा गैरवापर करणे आणि हवाला व्यवसाय चालवणे असे आरोप आहेत.

या मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने आत्तापर्यंत अभिनेता रणबीर कपूर, हुमा कुरेशी, हिना खान आणि कॉमेडियन कपिल शर्मा यांना समन्स पाठवले आहे.

रणबीर कपूरवर महादेव बेटिंग ॲपची जाहिरात केल्याचा आणि त्या बदल्यात मोठी रक्कम मिळवल्याचा आरोप आहे. रणबीरला मिळालेली रक्कम गुन्ह्यातील होती असे ईडीचे म्हणणे आहे.

महादेव बेटिंग हे अनेक ऑनलाइन गेमिंग वेबसाइट आणि ॲप्सचे सिंडिकेट आहे. त्याचे मुख्यालय UAE मध्ये आहे आणि तेथून ते चालते. या ॲप्लिकेशनची कॉल सेंटर्स श्रीलंका, नेपाळमध्येही आहेत. ॲप कथितरित्या क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, पोकर आणि कार्ड्ससह विविध लाइव्ह गेम्सवर बेकायदेशीर सट्टेबाजीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म प्रदान करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: इफ्फीत काय आणि कुठे पाहाल? संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

SCROLL FOR NEXT