Madras HC Dainik Gomantak
देश

IS मध्ये जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला HC ने जामीन का दिला? हिंदू नेत्याच्या हत्येवर विशेष टिप्पणी

Madras High Court: सुनावणीनंतर न्यायालयाने UAPA अंतर्गत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला सशर्त जामीन मंजूर केला आणि हा वादाचा मुद्दा असल्याचे सांगितले.

Manish Jadhav

Madras HC on Comment Targeted Killing of Hindu Leader: मद्रास उच्च न्यायालयात एका हिंदू नेत्याच्या टार्गेट किलिंगच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान बुधवारी वाद झाला, ज्यामध्ये मुद्दा असा होता की, हिंदू धर्मगुरुंच्या टार्गेट किलिंगला UAPA च्या कलम 15 अंतर्गत दहशतवादी घटना मानता येईल का? सुनावणीनंतर न्यायालयाने UAPA अंतर्गत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला सशर्त जामीन मंजूर केला आणि हा वादाचा मुद्दा असल्याचे सांगितले.

सुनावणीदरम्यान खंडपीठाने काय म्हटले

दरम्यान, न्यायमूर्ती एस एस सुंदर आणि न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान खंडपीठाने सांगितले की, पुराव्यांवरुन असे दिसून आले आहे की काही धार्मिक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता. UAPA च्या कलम 15 अंतर्गत परिभाषित केलेल्या या घटनेला दहशतवादी घटना म्हणून कोणत्या संदर्भात समजले जाईल हे अधिकाऱ्यांनी सांगितले नाही. यूएपीए अंतर्गत एनआयएने आसिफ मुस्ताहीनच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही प्रतिक्रिया दिली होती.

हिंदू धर्मगुरुंच्या हत्येचा कट

फिर्यादीनुसार, आरोपी कथितपणे IS मध्ये सामील होऊ इच्छित होता. विशेष म्हणजे, तो दुसऱ्या आरोपीच्या निकट जाऊ लागला, जो आधीपासूनच दहशतवादी संघटनेचा सदस्य होता. याशिवाय, या दोन्ही आरोपींनी भाजप आणि आरएसएसशी संबंधित हिंदू धर्मगुरुंना मारण्याची योजना आखली होती. तथापि, खंडपीठाने फिर्यादीच्या युक्तिवादाशी असहमती दर्शविली आणि सांगितले की, आरोपी आयएसमध्ये सामील झाल्याचे किंवा दुसरा आरोपी दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे पुराव्यामधून कोणतेही संकेत मिळाले नाहीत.

आरोपी 17 महिने तुरुंगात होता

दरम्यान, असिफ मुस्ताहीनला NIA ने 26 जुलै 2022 रोजी UAPA अंतर्गत गुन्हे केल्याबद्दल अटक केली होती. यापूर्वी ट्रायल कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला होता. आसिफ मुस्ताहीन गेल्या 17 महिन्यांपासून तुरुंगात होता. खंडपीठाने आरोपीला सशर्त जामीन मंजूर करुन पुढील आदेशापर्यंत इरोड येथे राहून दररोज सकाळी 10.30 वाजता ट्रायल कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT