Madras High Court Dainik Gomantak
देश

'आई जे करु शकते, ते कोणी करु शकत नाही...', 8 वर्षाच्या मुलीच्या ताब्यासंबंधी HC चा ऐतिहासिक निर्णय

Madras High Court: 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची योग्य काळजी फक्त आईच घेऊ शकते. त्यामुळे पती-पत्नी वेगळे झाल्यास अशा मुलांचा ताबा पत्नीला मिळायला हवा.

Manish Jadhav

Madras High Court Latest Verdict in Favour of Mother: मद्रास उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची योग्य काळजी फक्त आईच घेऊ शकते. त्यामुळे पती-पत्नी वेगळे झाल्यास अशा मुलांचा ताबा पत्नीला मिळायला हवा.

न्यायमूर्ती आर. सुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती डी. नागार्जुन यांच्या खंडपीठाने आठ वर्षांच्या मुलीच्या ताब्यात घेण्याशी संबंधित प्रकरणावर हा निकाल दिला. गेल्या एक वर्षापासून संबंधित व्यक्ती आपल्या मुलीशिवाय अमेरिकेत राहत होता.

त्याने आपल्या मुलीला त्याच्या वृद्ध आई-वडिलांकडे मुंबईत सोडले होते. आईसोबत राहणे मुलांच्या हिताचे असते. चार आठवड्यात मुलीचा ताबा आईकडे सोपवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने संबंधित व्यक्तीला दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, स्टालिन सॅम्युअल आणि ग्रेसी सिल्विया यांचे 2014 मध्ये लग्न झाले होते. दोघेही काही दिवस मुंबईत राहिले, नंतर अमेरिकेला गेले. 2015 मध्ये त्यांना एक मुलगी झाली, मात्र त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला.

मुलीचा ताबा वडिलांना मिळाला. त्यानंतर त्याने तिला आई-वडिलांकडे मुंबईत सोडून स्वतः अमेरिकेला गेला. 2020 मध्ये, त्याला तिला सोबत घेऊन जायचे होते, परंतु सालेमच्या न्यायालयाने त्याला मुलीला अमेरिकेत नेण्यापासून रोखले.

त्यामुळे त्याने आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी अमेरिकेतील (America) चांगली पगाराची नोकरी सोडून मुंबईत काम करायला सुरुवात केली. 2022 मध्ये सालेम न्यायालयाने मुलीला तिच्या आईकडे सोपवण्याचे आदेश दिले.

वडीलाने सांगितले- मुलीची काळजी घेण्यासाठी अमेरिकेची नोकरी सोडली

मुलीच्या वडिलांनी न्यायालयात सांगितले की, 2020 मध्ये सालेम न्यायालयाने मुलीला अमेरिकेत नेण्यापासून रोखले होते. या कारणामुळे मुलीला त्याला आपल्या वृद्ध आई-वडिलांकडे सोडावे लागले.

मुलीच्या वडिलांनी पुढे सांगितले की, काही दिवसांनी त्यांनी आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी अमेरिकेतील चांगली नोकरी सोडली आणि मुंबईत काम करायला सुरुवात केली. दरम्यान, 2022 मध्ये सालेम न्यायालयाने मुलीचा ताबा त्याच्या पत्नीकडे सोपवण्याचे आदेश दिले.

स्टॅलिन यांनी या निर्णयाला मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court) आव्हान दिले होते, त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयानेही आज मुलीच्या आईच्या बाजूने निकाल दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT