madhya pradesh rewa rape accused mahant sitaram parade bulldozer run on property  Dainik Gomantak
देश

बलात्कारातील आरोपीची पोलिसांनी काढली धिंड

आरोपीला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी

दैनिक गोमन्तक

मध्य प्रदेशातील रीवा येथील राज निवासमध्ये अल्पवयीन मुलीसोबत सामूहिक बलात्काराचा मुख्य आरोपी महंत सीतारामची पोलिसांनी धिंड काढली. महंताला पोलिसांनी अटक करताच त्यांचे वडिलोपार्जित घर बुलडोझरने उद्ध्वस्त केले. एवढेच नाही तर पोलिसांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यापासून जिल्हा न्यायालयापर्यंत त्याची अनवाणी काढली धिंड काढली.

यूपीनंतर आता मध्यप्रदेशातही बुलडोझरचा चमत्कार पाहायला मिळत आहे. राज निवास येथील सामूहिक बलात्काराच्या घृणास्पद कृत्यामुळे संतप्त झालेले मुख्यमंत्री (CM) शिवराज सिंह चौहान यांचा बुलडोझर महंत सीताराम यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानी पोहोचला. आता शिवराजच्या आदेशावरून कारवाईत आलेल्या प्रशासनाने सीताराम यांच्या गुडवा गावात बांधलेली पक्की इमारत बुलडोझरने जमीनदोस्त केली.

28 मार्च रोजी राज निवास येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्यानंतर महंत पळून या इमारतीत लपला होता. 30 मार्च रोजी पोलिसांनी महंत यांना बैधन बसस्थानकातून अटक केली. 31 रोजी सीताराम यांचे जिल्हा रुग्णालयात मेडिकल झाले. सीतारामला तुरुंगात पाठवण्यापूर्वी सिव्हिल लाइन पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी नेले.

पोलिसांची गाडी खराब होती, त्यामुळे सीताराम यांना पोलिस ठाण्यापासून कोर्टापर्यंत पायी नेण्यात आले. महंत सीतारामची कडक उन्हात धिंड काढण्यात आली. मुख्य आरोपी सीतारामसोबत इतिहासलेखक विनोद पांडेही होते. दोन्ही आरोपींना पोलिसांच्या (police) सुरक्षा रक्षकाखाली न्यायालयात हजर करण्यात आले.

येथे पोहोचताच वकिलांनी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि फाशीची मागणी केली. महंतांना पोलीस बंदोबस्तात पाहण्यासाठी कोर्टात मोठी गर्दी झाली होती आणि लोक शिवीगाळ करत होते. वकिलांची समजूत काढण्यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले. मुख्य आरोपीचे काळे कृत्य उघड करण्यासाठी पोलिसांनी दोन दिवसांची न्यायालयीन (court) कोठडी घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT