Court Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh High Court: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; घातली ‘ही’ अट

Madhya Pradesh High Court: अल्पवयीन मुलीला अश्लील कॉल आणि व्हॉट्सॲपद्वारे सतत त्रास देणाऱ्या आरोपीला न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला.

Manish Jadhav

Madhya Pradesh High Court: अल्पवयीन मुलीला अश्लील कॉल आणि व्हॉट्सॲपद्वारे सतत त्रास देणाऱ्या आरोपीला न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला. त्या बदल्यात न्यायालयाने आरोपीला समाज सेवा करण्यास सांगितले. आरोपी चांगल्या कुटुंबातील असल्याचेही न्यायालयाकडून नमूद करण्यात आले. न्यायालयाचे म्हटले की, या प्रकरणातील आरोपीने अत्यंत घृणास्पद कृत्य केले आहे, परंतु आरोपीला त्याचे वर्तन सुधारण्याची एक संधी दिली पाहिजे.

रुग्णालयात काम करण्याची शिक्षा

दरम्यान, न्यायमूर्ती आनंद पाठक या खटल्याची सुनावणी करत होते. 16 मे रोजी त्यांनी आदेश जारी केला होता. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, न्यायालयाने आरोपी विद्यार्थ्याला भोपाळ जिल्हा रुग्णालयात दर शनिवार आणि रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत डॉक्टर आणि कंपाउंडर्सना मदत करण्यास सांगितले. मात्र, त्यासाठी काही अटीही ठेवण्यात आल्या, ज्यामध्ये रुग्णाला औषधे, इंजेक्शन आदी न देणे. त्याचबरोबर प्रायव्हेट वॉर्डमध्ये जाऊ न देणे आदी बाबींचा समावेश आहे.

काय म्हणाला आरोपी?

जामीन अर्जात आरोपीने म्हटले की, बराच काळ त्याला जेलमध्ये ठेवल्यास त्याच्या शिक्षणावर परिणाम होईल. आरोपीने वकिलाच्या माध्यमातून न्यायालयात सांगितले की, ‘’तो भविष्यात अशा कोणत्याही कृतीत सहभागी होणार नाही आणि एक चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न करेल. तसेच, तक्रारकर्त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याचीही खबरदारी घेईल.’’

रिपोर्टनुसार, आरोपीच्या पालकांनीही न्यायालयात सांगितले की, ‘त्यांना त्यांच्या मुलाच्या कृत्याची लाज वाटत आहे.’ आपला मुलगा भविष्यात असे कोणतेही कृत्य करणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. आरोपीच्या वकिलानेही न्यायालयाला जामीन देण्याची विनंती केली. वकिल महोदय म्हणाले की, 'तो सर्जनशील कार्य आणि सामुदायिक सेवांमध्ये सहभागी होऊ शकतो, ज्यामुळे त्याचा कथित अहंकार कमी होईल आणि नंतर त्याचे आचरण पाहून जामीन निश्चित केला जाऊ शकतो.'

न्यायालयाने काय म्हटले?

रिपोर्टनुसार, न्यायालयाने म्हटले की, ‘’...असे दिसते की अर्जदार हा विद्यार्थी आहे. त्यामुळे त्याला त्याचे आचरण सुधारण्याची एक संधी दिली जात आहे. जेणेकरुन तो कोणत्याही गुन्हेगारी कृत्यांमध्ये आणि विशेषत: IPC च्या कलम 354 (D) आणि POCSO कायद्याच्या कलम 11 आणि 12 मध्ये अडकून नये. तो एक चांगला नागरिक बनला पाहिजे.’’ दरम्यान, फिर्यादी पक्षाने आरोपीच्या जामिनाला विरोध करत पीडितेला त्रास दिल्याचे सांगितले.

न्यायालयाने पुढे म्हटले की, ‘’संपूर्ण केस डायरी आणि प्रतिवादी/स्टेटने दाखल केलेली माहिती वाचल्यानंतर असे दिसून येते की आरोपीने केलेले कृत्य अत्यंत घृणास्पद आहे. बीबीएच्या विद्यार्थ्याकडून अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही, ज्याला भविष्य घडवायचे आहे. तो एका चांगल्या कुटुंबातील आहे.’’

दरम्यान, 4 एप्रिल रोजी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मुलीचा छळ करणे, पाठलाग करणे आणि अश्लील कॉल केल्याचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jogamma Jogappa History: कार्तवीर्य अर्जुनाने जमदग्नीचा वध केल्याने रेणुका विधवा झाली; जोगम्मा आणि जोगप्पाची कथा

"शाहबाज शरीफ आणि आसिफ मुनीर महान लोक...''; दहशतवाद पसरवणाऱ्यांना ट्रम्प यांच्याकडून 'ग्रेट पीपल'चा दर्जा, आसियान परिषदेत उधळली स्तुतीसुमने

Upcoming Phones: Realme, OnePlus... 'या' आठवड्यात लॉन्च होणार 'हे' जबरदस्त स्मार्टफोन; फीचर्स एकदा पाहाच…

गोमंतकीय जोडप्याने मणिपूरात उभारले प्रार्थनास्थळ; मुनपी गावात पहिल्यावहिल्या 'सेंट जोसेफ चर्च'चे लोकार्पण!

ENG vs NZ 1st ODI: इंग्लंडच्या हॅरी ब्रूकचा महाविक्रम! 32 वर्षांपूर्वीचा रॉबिन स्मिथचा मोडला रेकॉर्ड; एकाकी लढत देऊन ठोकले 'दमदार शतक' VIDEO

SCROLL FOR NEXT