Shivraj Singh Chouhan Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh: ट्रान्सजेंडर्संना शिवराज मामा देणार मोठी भेट, सरकारी नोकरीचा मिळणार अधिकार

Madhya Pradesh Government: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकार सक्रिय झाले आहे.

Manish Jadhav

Madhya Pradesh Government: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकार सक्रिय झाले आहे. राज्य सरकारकडून एकापाठोपाठ एक अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशात ट्रान्सजेंडर्सच्या हक्कांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये आता सरकार (Government) ट्रान्सजेंडर्सना सरकारी नोकऱ्या देणार आहे. म्हणजेच आता थेट भरतीमध्ये ट्रान्सजेंडरचा समावेश होणार आहे. याबाबतचे पत्र सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी जारी केले. सरकारच्या दस्तऐवजांमध्ये आता स्त्री-पुरुषांसोबत ट्रान्सजेंडर हा शब्दही लिहिला जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सरकारी नोकरीचा हक्क मिळेल

आता राज्य सरकारने निर्देशित केलेल्या भरतीमध्ये ट्रान्सजेंडरनाही संधी दिली जाणार आहे. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने हे पत्र अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सर्व विभागप्रमुख, जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व कार्यालयांना पाठवले आहे.

प्रत्यक्षात राज्य सरकारच्या सर्व दस्तऐवजांमध्ये ज्या ठिकाणी लिंग या कॉलममध्ये बायसेक्शुअल हा शब्द वापरला जाईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दारुबाबत निर्णय

नुकतीच राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या मंत्रिमंडळ (Cabinet) बैठकीची माहिती देताना मंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले होते की, राज्यात जिथे जिथे बसण्याची आणि दारु पिण्याची व्यवस्था असेल तिथे दारुची दुकाने आणि बार बंद केले जातील.

तसेच, शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात दारुविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतरही जनावरे, पिके आदींच्या सहाय्य शुल्काच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी राज्यात जोरात सुरु आहे. अशा स्थितीत राज्य सरकार सक्रिय दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT