Madhya Pradesh Accident Dainik Gomantak
देश

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Madhya Pradesh Road Mishap Six Dead: भाविकांनी भरलेली एक ट्रॅक्टर-ट्रॉली अनियंत्रित होऊन दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Manish Jadhav

Madhya Pradesh Road Mishap Six Dead: मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. येथे भाविकांनी भरलेली एक ट्रॅक्टर-ट्रॉली अनियंत्रित होऊन दरीत कोसळल्याने 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामध्ये सुमारे 40 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये जवळपास 50 प्रवासी स्वार होते आणि हे सर्वजण एका धार्मिक पूजेसाठी मंदिरात चालले होते. प्रवासादरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला. या घटनेवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांसाठी आर्थिक मदत जाहीर केली.

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात (Accident) शुक्रवारी संध्याकाळी करणपत्थर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिजाउरा गावाजवळ घडला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जगन्नाथ मरकाम यांनी सांगितले की, ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये अंदाजे 50 लोक बसले होते. चालक अचानक वाहनावरील ताबा गमावून बसला आणि ट्रॅक्टर थेट दरीत उलटला. हे सर्व भाविक पद्मनिया येथून बिजाउरा गावातील एका मंदिरात पूजेसाठी जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले.

या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जणांनी रुग्णालयात उपचारादरम्यान दम तोडला. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उमरिया जिल्ह्यातील पाली सामुदायिक आरोग्य केंद्र आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

या हृदयद्रावक घटनेवर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शनिवारी तीव्र दुःख व्यक्त करत पीडित कुटुंबियांबद्दल संवेदना प्रकट केल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, अनुपपूर जिल्ह्यातील पुष्पराजगडच्या बिजौरा गावात भाविकांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर-ट्रॉली उलटल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. राज्य सरकारकडून अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4-4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश देण्यात आले, तसेच जखमींना योग्य आणि मोफत उपचार पुरवण्याचे आदेश दिले. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांनी बाबा महाकाल यांच्या चरणी केली. या घटनेमुळे संपूर्ण मध्य प्रदेश आणि भाविकांच्या गावावर शोककळा पसरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT