Lucknow Double Murder In Krishnanagar: लखनौमधून एक संतापजनक घटना समोर आली. लखनौच्या कृष्णानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भोला खेडा परिसरात शुक्रवारी (9 ऑक्टोबर) सकाळी एकाच कुटुंबातील दोन महिलांच्या हत्येमुळे मोठी खळबळ उडाली. येथील गौरी स्टुडिओच्या गल्लीत असलेल्या एका घराच्या खोलीमधून 55 वर्षीय आई आणि 32 वर्षीय मुलीचे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आले. प्राथमिक तपासात या दोन्ही महिलांची अत्यंत निर्घृणपणे गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, या दुहेरी हत्याकांडामुळे स्थानिक नागरिक पूर्णपणे चक्रावून गेले आहेत. अचानक एवढी मोठी दुर्घटना कशी घडली, याबाबत शेजाऱ्यांमध्ये नानाविध चर्चा सुरु आहेत. मृत महिलांची ओळख 55 वर्षीय श्यामदुलारी (रविंद्र शंकर यांची पत्नी) आणि त्यांची 32 वर्षीय मुलगी पूजा साहू अशी पटली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करुन तपास सुरु केला.
सध्या या दुहेरी हत्याकांडामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र पोलिसांची पथके या प्रकरणाची उकल करण्यासाठी पुराव्यांचा शोध घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात हत्येच्या संशयावरुन पोलिसांनी मृत महिलेच्या पतीलाच ताब्यात घेतले. डीसीपी साउथ मोहम्मद मुस्ताक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविंद्र शंकर गुप्ता हे होमगार्ड म्हणून नोकरी करतात आणि त्यांनी स्वतःच पोलिसांना पत्नी व मुलीच्या हत्येची माहिती दिली.
कुटुंबातीलच मोठ्या मुलीच्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. प्राथमिक तपासादरम्यान कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मृत तरुणी एका तरुणाशी फोनवर बोलत असल्याच्या कारणावरुन घरात वारंवार वाद आणि भांडणे होत असत, असा संशय पोलिसांना (Police) आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले असून, या घटनेचा पुढील सखोल तपास सुरु आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.