LPG Cylinders  Dainik Gomantak
देश

LPG Cylinder Price: महागाईतून दिलासा; एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मोठी घट, वाचा सविस्तर

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 91.50 रुपयांनी घट केली आहे.

दैनिक गोमन्तक

LPG Cylinder Price Today:  नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आज 1 एप्रिल 2023 मोदी सरकारने नागरिकांना मोठी भेट दिली आहे. सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 91.50 रुपयांनी घट केली आहे. तर, घरगुती एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही.

घरगुती (Home) एलपीजी सिलिंडरसाठी ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच रक्कम द्यावी लागणार आहे. दिल्लीत आजपासून 19 किलो व्यावसायिक सिलिंडर 2 हजार 28 रुपयांना मिळणार आहे. गेल्या माहिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 350 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आजपासून व्यावसायिक सिलिंडरची किंमत 91. 50 रुपयांनी घट करण्यात आली आहे. दिल्ली आजपासून 19 किलो एलपीजी व्यावसायिक सिलिंडर 2 हजार 28 रुपयांना मिळणार आहे. तसेच कोलकाता (2 हजार 132), मुंबई (1 हजार 980) आणि चेन्नईमध्ये 2 हजार 192 रुपये इतकी किंमत असेल.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1 हजार 3 रुपये आहे.

तसेच कोलकातामध्ये 1 हजार 129 रुपयांना उपलब्ध असेल. मुंबईत (Mumbai) घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1 हजार 102 रुपये आहे. चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 1 हजार 119 रुपये मोजावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT