Amit Shah On Lok Sabha Elections X, @ANI
देश

Amit Shah: लोकसभा निवडणुका देशाचे पुढील २५ वर्षांचे भवितव्य ठरवतील: अमित शहा

Amit Shah At ‘NXT10’ : “15 ऑगस्ट 2047 साठी आमचे ध्येय पूर्ण विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र आणि अव्वल 3 जागतिक अर्थव्यवस्थांचा भाग असेल."

Ashutosh Masgaunde

Amit Shah On Lok Sabha Elections:

मुंबईत इंडिया ग्लोबल फोरमच्या (IGF) वार्षिक गुंतवणूक समिट ‘NXT10’ मध्ये बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकांबद्दल आपली मते व्यक्त करत या निवडणुका का महत्त्वाच्या आहेत, हे अधोरेखित केले.

ते म्हणाले, “जगभरातील निवडणुका संबंधित राष्ट्रांसाठी त्यांचे पुढील पाच वर्षांचे भविष्य ठरवतील, पण भारतातील आगामी निवडणुका आपल्या देशासाठी पुढील 25 वर्षे ठरवतील.”

आपल्या भाषणात, केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पुढील दशकासाठी काय दृष्टीकोन आहे याची माहिती दिली.

गेल्या दहा वर्षांत केलेल्या आर्थिक, कायदेशीर आणि सामाजिक सुधारणांची माहिती देताना गृहमंत्री म्हणाले, “गेल्या दशकात पंतप्रधान मोदींनी विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनवादी बदल घडवून आणले आहेत. स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असताना पुढील पाच वर्षांत घेतलेले निर्णय भारताचे जगातील स्थान निश्चित करतील."

यावेळी आपल्या भाषणादरम्यान गृहमंत्री म्हणाले की, “15 ऑगस्ट 2047 साठी आमचे ध्येय पूर्ण विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र आणि अव्वल 3 जागतिक अर्थव्यवस्थांचा भाग असेल. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, आमच्याकडे पुढील 25 वर्षांचा रोडमॅप आहे.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Heatwave Alert: युरोपमध्ये भीषण उष्णतेची लाट! 26 देशात हाहाकार, फ्रान्समध्ये 58 मृत्यू; 14 हून अधिक देशात 'रेड अलर्ट'

Goa Politics: केवळ फातोर्डासाठी काँग्रेसशी युती नको, गोव्यात सत्तेसाठी विरोधकांची एकजूट गरजेची; विजय सरदेसाईंनी स्पष्ट केलं युतीचं गणित

Saligao Waste Plant: पर्यटन पट्ट्यात दुर्गंधीचे साम्राज्य! साळगाव कचरा प्रकल्पाच्या ढिसाळ कारभाराचे वास्तव चव्हाट्यावर; मायकल लोबोंनी व्यक्त केली चिंता

Viral Video: 'रिक्षाच्या पुढून धावली अन् थेट...' चिमुरडीचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही पाहिला का?

Goa Cooperative Societies: सहकारी सोसायट्यांमधील ठेवींत 454 कोटींनी वाढ; थकीत कर्ज 258 कोटींनी वाढले, सरकारी अहवालातील निष्कर्ष

SCROLL FOR NEXT