Tokay gecko Lizard  Dainik Gomantak
देश

Lizard Worth Rupees 2 Crores Seized: 2 कोटी रूपयांची दुर्मिळ पाल औषध दुकानातून जप्त, 5 जणांना अटक

बिहार पोलिसांची कारवाई : मर्दानगी वाढविणाऱ्या औषधांत होतो वापर

Akshay Nirmale

Lizard Worth Rupees 2 Crores Seized: बिहारच्या पुर्णिया जिल्ह्यात एक दुर्मिळ प्रजातीची पाल बिहार पोलिसांनी जप्त केली आहे. टोकाय गेयको प्रजातीच्या या पालीची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत दोन कोटी रूपये असल्याचे सांगितले जाते. नेपाळमार्गे या पालीची परदेशात तस्करी केली जाणार होती.

पुर्णिया जिल्ह्यातील बायसी येथील ताज मेडिकल या दुकानातून पोलिसांनी ही पाल जप्त केली. बायसी येथील तपास नाक्यावर यापुर्वीही दुर्मिळ प्रजातीच्या पाली जप्त करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणी पश्चिम बंगालच्या शेख गरीबुल, मोहन लाल सरकार, मोहम्मद जफ्पर, मोहम्मद अरसद आलम आणि दुकानदार मलिक मोहम्मद दिलनवाझ यांना अटक केली आहे. पश्चिम बंगालच्या करंडीघी येथून ही पाल बिहारमध्ये आणण्यात आली होती.

बायसी येथील डीएसपी आदित्यकुमार यांनी सांगितले, पोलिसांना मेडिकल दुकानात दुर्मिळ प्रजातीची पाल असल्याची माहिती मिळाली होती. तसेच विक्रीस बंदी असेल्या कोडिनयुक्त कफ सिरपच्या 600 बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या.

या औषधांमध्ये होतो वापर

टोके गायको प्रजातीची ही पाल शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. तसेच यापासून अनेक औषधे बनवली जातात. मर्दानगी वाढविणाऱ्या औषधांमध्येही या पालीचा वापर केला जातो. या पालीच्या मांसाचा वावर नपुंसकता, मधुमेह, एड्स आणि कॅन्सर सारख्या रोगांवर परंपरागत औषधांमध्येही केला जातो.

येथे आढळते ही पाल?

ही पाल टॉक के असा आवाज काढते. त्यामुळेच तिला टोके गेको असे नाव पडले आहे. ही पाल टोके गेयको प्रजातीच्या पाली पश्चिम बंगाल, केरळ, आग्नेय आशिया, नेपाळ, ईशान्य भारत, बिहार, फिलिपाईन्स येथील घनदाट जंगलात आढळून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Diwali Celebration With Jawan's: ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जल्लोष! पंतप्रधान मोदी गोव्यात नौदलाच्या सैनिकांसोबत साजरी करणार यंदाची दिवाळी

IND vs AUS ODI: कांगारुंची दाणादाण उडवायला टीम इंडिया सज्ज, पहिल्या वनडेत कोणत्या 11 शिलेदारांना मिळणार संधी? गिल-रोहित सलामीला, मग जैस्वालचं काय?

Goa News: रामा कानकोणकर हल्ला प्रकरण; झेनिटो कार्डोझोला २ दिवसांची पोलिस कोठडी

Narkasur in Goa: 20 फुट उंच, अक्राळ-विक्राळ डोळ्यांचा महाकाय! जगात सापडणार नाही असा अनुभव; कुठे बघाल 'नरकासुर दहनाचा' थरार?

Afghanistan Pakistan Clash: तालिबानच्या हल्ल्याने पाकिस्तानची नाचक्की! सैनिकांच्या पॅन्ट आणि शस्त्रे जप्त; 48 तासांची युद्धबंदी जाहीर Watch Video

SCROLL FOR NEXT