Lightning havoc: 41 people died in UP, 20 in Rajasthan and 7 in MP Dainik Gomantak
देश

आकाशातून मृत्यूचा तांडव.. देशात 67 जणांचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

रविवारी राजस्थानात(Rajashtan) आकाशातून अक्षरश मृत्यूने तांडव घातलं आहे . रविवारी राजस्थानमध्ये वीज कोसळल्याने(Lightning) वीस जणांचा मृत्यू झाला आहे . जयपूरच्या(Jaipur) आमेर महालच्या वॉच टॉवरवर वीज कोसळल्याने अकरा जणांना आपला जीव गमवावा लागला. जयपूरमधील बारा जणांव्यतिरिक्त, कोटामध्ये 4, धौलपूरमधील जणांचा मृत्यू झाला असून मुख्यमंत्री गेहलोत(Ashok Gehlot) यांनी मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबासाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

आमेर महालच्या वॉच टॉवरवरील मृतांपैकी बरेचजण तरूण होते जे गडाजवळील डोंगरावर आनंददायी वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. त्यातील काहीजण वॉच टॉवरवर सेल्फी घेत होते. अनेकजण डोंगरावर उपस्थित होते. तर हेच तरुण विजेच्या विळख्यात सापडले आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.

वीज कोसळल्याने झालेल्या जीवितहानीवर शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले की, कोटा, ढोलपूर, झालावाड़, जयपूर आणि बारानमध्ये वीज कोसळल्याने झालेल्या जीवितहानीची घटना अत्यंत दु:खद व दुर्दैवी आहे. पीडित कुटूंबियांबद्दल माझे मनःपूर्वक शोक, देव त्यांना सामर्थ्य देईल. पीडित कुटुंबियांना तातडीने मदत देण्याच्या सूचना अधिकार्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

तर दुसरीकडे उत्तर प्रदेश(Uttar Pradesh) आणि मध्य प्रदेश(Madhya Pradesh) मध्येहीअशाच थरारक घटना घडल्या आहेत.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश मध्ये वीजकसळून एकूण 41 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मध्य प्रदेश 7 जण मृत्युमुखी पडले आहेत.

यूपी सरकारच्या म्हणण्यानुसार प्रयागराजमध्ये वीज कोसळल्याने सर्वाधिक 14 जणांचा मृत्यू झाला आहे.कानपूर देहात आणि फतेहपूरमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. कौशांबीमध्ये 4, फिरोजाबादमध्ये 3 , उन्नाव-हमीरपूर-सोनभद्रात 2 मृत्यू, तर कानपूर नगर-प्रतापगड-हरदोई-मिर्जापूरमध्ये 1 मृत्यू झाला आहे.

मध्य प्रदेशातही वीज कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत मध्य प्रदेशात वीज कोसळल्याने वेगवेगळ्या ठिकाणी सात जणांचा मृत्यू झाला आहे. श्योपूर आणि ग्वाल्हेर जिल्ह्यात वीज कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय शिवपुरी-अनूपपूर-बैतूल जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT