Dangerous Stunt Video Dainik Gomantak
देश

Bike Stunt Video: दुचाकीवरुन 6 पठ्ठ्यांचा जीवघेणा प्रवास, वाहतूक नियमांना केराची टोपली दाखवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्स संतापले

Dangerous Stunt Video: सध्या असाच एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात 6 तरुण एकाच दुचाकीवरुन प्रवास करताना दिसत आहेत.

Manish Jadhav

Bike Stunt Video: सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात, जे पाहिल्यानंतर यूजर्स थक्क होतात. विशेषतः वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे आणि धोकादायक कृत्य करणारे व्हिडिओ नेहमीच चर्चेत असतात. सध्या असाच एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात 6 तरुण एकाच दुचाकीवरुन प्रवास करताना दिसत आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा!

वाहतूक नियमांचे खुलेआम उल्लंघन

दरम्यान, हा व्हिडिओ भारतातील कोणत्या शहरी भागात चित्रित केलेला असावा, जिथे हे तरुण वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली करत आहेत हे कळालेले नाही. व्हिडिओत एकाच दुचाकीवर सहा जण बसले आहेत. यातील शेटवचे दोघेजण अत्यंत धोकादायकरीत्या मागे लटकलेले दिसत आहेत, ज्यामुळे त्यांचा आणि रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या इतरांचा जीव धोक्यात येत आहे. व्हिडिओमध्ये हे तरुण केवळ नियमांचे उल्लंघनच करताना दिसत नाहीत, तर त्यांना कोणीतरी व्हिडिओ काढत असल्याचे लक्षात येताच ते अत्यंत बेजबाबदारपणे प्रतिक्रियाही देतात.

'यमराज' सोबतचा प्रवास?

हा व्हिडिओ 'एक्स'वर @dcchoudhary1909 नावाच्या हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये युजरने अत्यंत परखड शब्दांत या तरुणांना फटकारले. "बाईकवर 6 जण बसलेले दिसत आहेत, पण त्यांच्यासोबत 7वा व्यक्तीही आहे जो ना आपल्याला दिसतोय, ना या बाईकवाल्यांना... आणि तो आहे महाराज यमराज. या अज्ञानी लोकांना हे माहीत नाही की तो यम आहे, जो क्षणात आपटून त्यांना लगेच घेऊन जाईल."

व्हिडिओमधील बेफिकिरी

व्हिडिओमध्ये एक कारस्वार या धोकादायक कृत्याबद्दल तरुणांना थांबवण्याचा प्रयत्न करतो. कारस्वार ओरडतो, "ये... ये देखो!" आणि मग तो मोठ्याने ओरडतो, "हॅलो भाई... हॅलो!" कारस्वारचा कॅमेरा आपल्याकडे बघत असल्याचे लक्षात येताच दुचाकीवरील तरुणांची प्रतिक्रिया अविश्वसनीय असते. सर्वात मागे लटकलेला तरुण आणि मध्ये बसलेला त्याचा साथीदारही कारस्वाराच्या दिशेने मोठ्याने ओरडतो. सर्वात धक्कादायक म्हणजे, त्यातील एका तरुणाने 'विक्टरी साइन' दाखवले. या तरुणांना त्यांच्या जीवापेक्षा या बेजबाबदार कृत्याची आणि त्यातून मिळणाऱ्या तात्पुरत्या प्रसिद्धीची जास्त काळजी आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते.

यूजर्सच्या प्रतिक्रियांचा भडिमार

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक यूजर्संनी संताप व्यक्त केला आणि या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

  • एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले की, "यांच्यासारख्या लोकांना कोणीही समजावू शकत नाही."

  • दुसऱ्या एका युजरने उपरोधिकपणे लिहिले की, "यांना अजून चंद्रगुप्तजींनी (यमराज) शॉर्टलिस्ट केले नाहीये."

अशा प्रकारच्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे केवळ स्वतःचाच नाही, तर इतरांचाही जीव धोक्यात येतो. पोलिसांनी आणि वाहतूक विभागाने या व्हिडिओची दखल घेऊन अशा बेजबाबदार तरुणांवर तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. कारण, त्यांच्या एका चुकीमुळे कधीही मोठा अपघात होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शापोरा नदीमुखाजवळ गाळाचा उपसा कासवांसाठी धोकादायक, काम स्थगित करण्याची वैज्ञानिकांकडून मागणी

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

सखा सोबती बनला वैरी? सुरक्षेची जबाबदारी झटकून ट्रम्प आता ग्रीनलँड 'गिळंकृत' करणार? - संपादकीय

Weekly Finance Horoscope: जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी ठरणार 'गेमचेंजर'! नोकरी-व्यवसायात मोठी झेप! 'या' राशींचे आर्थिक प्रश्न सुटणार

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

SCROLL FOR NEXT