Terror Attack Dainik Gomantak
देश

Terror Attack: 'लश्कर' आणि 'जैश'चा भयानक कट! काश्मीरसह दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये मोठ्या हल्ल्याचा डाव; गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर

LeT JeM Planning Attack: पाकिस्तान-समर्थित दहशतवादी गटांनी जम्मू-काश्मीर, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशला लक्ष्य करण्याच्या आपल्या योजना पुन्हा सक्रिय केल्या आहेत.

Manish Jadhav

LeT JeM Planning Attack: पाकिस्तान-समर्थित दहशतवादी गटांनी जम्मू-काश्मीर, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशला लक्ष्य करण्याच्या आपल्या योजना पुन्हा सक्रिय केल्या आहेत. ताज्या गुप्तचर माहितीमुळे संपूर्ण देशातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आले, ज्यात त्यांच्या स्लीपर सेलना पुन्हा सक्रिय करण्याच्या माहितीचा समावेश आहे.

सध्या मिळालेल्या माहितीनुसार, कडाक्याची थंडी सुरु होण्यापूर्वीच हे गट जम्मू-काश्मीरसह दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचत आहेत. यामध्ये आत्मघाती हल्ला केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्याचा प्रयत्न

दहशतवादी कारवायांमध्ये झालेली ही वाढ 2025 च्या सुरुवातीला भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'चा बदला घेण्यासाठी असल्याचे मानले जात आहे. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारतीय सुरक्षा दलांनी पाकव्याप्त काश्मीर आणि नियंत्रण रेषेपलीकडील पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, ज्यामुळे दहशतवादी गटांचे मोठे नुकसान झाले.

गुप्तचर सूत्रांनुसार, दहशतवादी युनिट्सनी घुसखोरी आणि हेरगिरी वाढवली आहे. ऑक्टोबर महिन्यात पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या म्होरके एकत्र आले. यामध्ये पाकिस्तानची (Pakistan) गुप्तचर संस्था ISI, जमात-ए-इस्लामी, हिजबुल मुजाहिदीन आणि 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये झालेल्या नुकसानीचा बदला घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे मिळालेले जुने कमांडर सहभागी होते. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानची बॉर्डर ॲक्शन टीम आणि स्पेशल सर्व्हिसेस ग्रुपचे कमांडो देखील LeT आणि JeM च्या दहशतवादी हँडलर्ससोबत सामील असल्याचे वृत्त आहे.

नार्को-टेरर आणि शस्त्रांची तस्करी वाढली

या दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी पंजाब आणि राजस्थान मार्गे नार्को-टेरर मार्ग आणि शस्त्रांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे दहशतवादी थंडीच्या कठीण परिस्थितीसाठी प्रशिक्षण घेत आहेत. नॉर्दर्न कमांडच्या गुप्तचर विभागाने पुष्टी केली की, जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. चिनाब व्हॅली आणि पीर पंजाल सारख्या भागात आता 131 दहशतवादी सक्रिय असून त्यापैकी बहुतांश पाकिस्तानी आहेत. 2025 पर्यंत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या मजबूत दहशतवाद विरोधी मोहिमांनंतरही ही वाढ एक मोठे आव्हान आहे.

देशभरात सुरक्षा यंत्रणांची सतर्कता

10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत (Delhi) झालेल्या जीवघेण्या स्फोटाशी संबंधित एका 'व्हाईट-कॉलर' दहशतवादी मॉड्यूलचा नुकताच पर्दाफाश झाला, ज्यात सुशिक्षित लोकांना गुप्तपणे दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त करण्यासारख्या नवीन दहशतवादी युक्त्या उघड झाल्या. आर्मी, CRPF आणि पोलीस दलांसह देशभरातील सुरक्षा यंत्रणांनी पेट्रोलिंग, पाळत ठेवणे, गाड्यांची कसून तपासणी आणि ड्रोन काउंटरमेजर उपाययोजना वाढवल्या आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये अनेक वर्षांच्या दहशतवादविरोधी यशानंतर झालेली ही वाढ एक मोठी धोक्याची घंटा आहे. सुरक्षा यंत्रणा एकत्रित हल्ले आणि अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी अत्यंत सतर्कता बाळगत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

IND vs SA 2nd Test: केएल राहुलला टर्न समजलाच नाही, सायमन हार्मरच्या 'अविश्वसनीय' चेंडूवर त्रिफळाचीत! तुम्ही VIDEO पाहिला का?

Smriti Mandhana: 'तिला' स्विमिंगसाठी विचारलं! पलाश मुच्छलचे भलत्याच मुलीसोबत चॅट्स व्हायरल; क्रिकेटर स्मृतीला मोठा धक्का?

Goa Live News: ५६ व्या IFFI मध्ये विविध राज्यांच्या लोकनृत्यांचे दर्शन; कलाकारांनी मानले आभार

Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

SCROLL FOR NEXT