Leopard Attacks Man Sunroof Jungle Safari: सोशल मीडियावर सध्या जंगल सफारीशी संबंधित एक अत्यंत थरारक आणि अंगावर काटा आणणारा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्याला पाहून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. अवघ्या काही सेकंदांच्या या क्लिपमधील दृश्य एखाद्या हॉलिवूड चित्रपटातील खरोखरच्या भयानक दृश्यासारखे भासते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका गोष्टीची प्रचिती येते ती म्हणजे, जंगलात फिरताना निष्काळजीपणा जिवावर बेतू शकतो.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कार जंगलातील रस्त्यावरुन हळूहळू पुढे जात असल्याचे दिसते. आजूबाजूला घनदाट जंगल आणि शांत वातावरण आहे. कारचा सनरुफ उघडा असून एक तरुण उभा आहे. त्याने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला असून तो अत्यंत बेफिकीरपणे निसर्गाचा आनंद घेत आहे किंवा कदाचित हा सुंदर क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्याच्या या बेपर्वा आनंदावर अवघ्या काही सेकंदात विरजण पडले. जेव्हा अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या दाट झुडपांमध्ये हालचाल होते. कारमधील लोकांना काही समजण्याच्या आतच बिबट्याने कारच्या सनरुफमधून बाहेर डोकावणाऱ्या त्या तरुणावर जीवघेणा हल्ला केला. ही संपूर्ण घटना इतक्या वेगात घडली की, कारमधील कोणालाही सावरण्याची संधीच मिळाली नाही.
व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे दिसते की, बिबट्याने तरुणाच्या डोके आणि मानेच्या दिशेने झेप घेतली. अचानक झालेल्या या भीषण हल्ल्यामुळे कारमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि भीतीचे वातावरण पसरले. हा व्हिडिओ एका विशिष्ट टप्प्यानंतर संपत असल्यामुळे पुढे नेमके काय घडले आणि तो तरुण सुखरुप बचावला की नाही, याची कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
ही धक्कादायक घटना पुन्हा एकदा आपल्याला याची जाणीव करुन देते की, जंगल हे मानवाचे नाही तर वन्यजीवांचे हद्दीचे क्षेत्र आहे. अशा ठिकाणी फिरताना प्रशासनाने दिलेले सुरक्षा नियम पाळणे अत्यंत अनिवार्य असते. अनेकदा पर्यटक चांगल्या फोटो किंवा व्हिडिओच्या मोहात पडून सनरुफमधून बाहेर येतात किंवा गाड्यांच्या खिडक्यांमधून बाहेर डोकावून प्राण्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. ही छोटीशी आणि अविचाराने केलेली चूक कधीकधी माणसाचा घात करु शकते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) समोर आल्यानंतर वाऱ्यासारखा पसरला. हजारो युजर्सनी तो आपल्या हँडलवर शेअर केला असून कमेंट सेक्शनमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी वन्यजीव सफारीदरम्यान अशा प्रकारची बेपर्वाई न करण्याचा इशारा दिला, तर काहींनी हा प्रकार अत्यंत भयानक आणि काळजात धडकी भरवणारा असल्याचे म्हटले. या घटनेने पुन्हा एकदा पर्यटकांच्या सुरक्षिततेचा आणि मार्गदर्शक नियमांच्या पालनाचा मुद्दा ऐरणीवर आणला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.