Leh Ladakh Egg Auction For Iran Dainik Gomantak n
देश

VIDEO: 10 रुपयांच्या अंड्याला लागली 'इतक्या' हजारांची बोली! इराणमधील युद्धग्रस्तांसाठी लडाखी जनतेचा मदतीचा हात; व्हिडिओ व्हायरल

Leh Ladakh Egg Auction For Iran: माणुसकीला कोणतीही सीमा नसते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा लडाखमधील लेह जिल्ह्याने जगाला दिला.

Manish Jadhav

Leh Ladakh Egg Auction For Iran: माणुसकीला कोणतीही सीमा नसते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा लडाखमधील लेह जिल्ह्याने जगाला दिला. मध्यपूर्वेतील भीषण युद्धात होरपळणाऱ्या इराणमधील नागरिकांच्या आणि विशेषतः लहान मुलांच्या मदतीसाठी लेहच्या जनतेने पुढाकार घेतला असून येथे एका अनोख्या लिलावाद्वारे निधी गोळा केला जात आहे. या लिलावामध्ये एका सामान्य अंड्याला तब्बल 25 हजार रुपयांची बोली लावून एका स्थानिक रहिवाशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बाजारात अवघ्या 10 रुपयांना मिळणाऱ्या या अंड्यासाठी एवढी मोठी रक्कम खर्च करण्यामागे केवळ आर्थिक मदत करणे हा उद्देश नसून इराणमधील मुलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करणे हा मुख्य हेतू आहे.

लेहमध्ये (Leh) एका खुल्या मैदानावर इराणमधील युद्धग्रस्तांना मदत करण्यासाठी हा लिलाव आयोजित करण्यात आला. यावेळी मोठी गर्दी जमली, जिथे लोकांनी आपल्या क्षमतेनुसार दान देण्यास सुरुवात केली. शबीर हुसैन या स्थानिक रहिवाशाने लिलावात 25 हजार रुपये देऊन एक अंडे खरेदी केले. याबद्दल बोलताना शबीर म्हणाले की, "अंड्याची किंमत 10 रुपये आहे हे सर्वांना ठाऊक आहे, पण ही 25 हजारांची रक्कम आम्ही इराणमधील चिमुकल्यांसाठी देत आहोत. तिथे मुलांवर होत असलेले अत्याचार पाहून आमचे मन हेलावले आहे. ही छोटीशी आर्थिक मदत त्या पीडितांच्या कामी यावी, एवढीच आमची इच्छा आहे."

शबीर हुसैन यांनी केवळ आर्थिक मदतच नाही, तर आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले की, आम्ही आमच्या समुदायासाठी आणि पीडितांसाठी प्रसंगी प्राण देण्यासही तयार आहोत. आमचे नेते जो आदेश देतील, त्याचे आम्ही पालन करु. सध्या केवळ मदतीचे आवाहन करण्यात आले असून, लेहच्या कानाकोपऱ्यातून लोक उत्स्फूर्तपणे पुढे येत आहेत. विशेष म्हणजे, या मदत मोहिमेत केवळ रोख रक्कमच नाही, तर लोक अन्नधान्य, कपडे आणि अगदी सोन्याचे दागिनेही दान करत आहेत. महिला आपल्या अंगावरील दागिने काढून इराणमधील गरजूंच्या मदतीसाठी स्वाधीन करत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे.

लडाखच्या या दुर्गम भागातून इराणसारख्या (Iran) दूरवरच्या देशातील लोकांसाठी निर्माण झालेली ही आत्मीयता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. युद्धाच्या या कठीण काळात जगभरातून मदतीचा ओघ सुरु असला, तरी लेहच्या सामान्य नागरिकांनी दाखवलेली ही संवेदनशीलता माणुसकीचा एक मोठा संदेश देणारी ठरली आहे. लेहमध्ये संकलित झालेली ही सर्व मदत विविध माध्यमांतून इराणमधील गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न स्थानिक संघटनांकडून केला जात आहे. प्रतिकूल हवामानात राहणाऱ्या लडाखच्या जनतेने दाखवलेल्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुख-वैभवाचा 'राजयोग'! शुक्राच्या पॉवरफुल्ल गोचरमुळे 'या' 3 राशींना तगड फायदा, आता फक्त पैसा अन् पैसाच; गोल्डन पिरीयड सुरु

Horoscope April 2026: 14 एप्रिलनंतर पालटणार 'या' राशीचं नशीब! गुरु आणि सूर्याच्या साथीमुळे कष्टाला मिळणार फळ; उत्पन्नाची दारे होणार खुली

US Israel Iran War: इस्रायल-अमेरिका हल्ल्यात इराणच्या गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू; युद्धविरामाच्या प्रस्तावादरम्यान संघर्षाचा भडका

US Iran War: इराणच्या वाळवंटात स्वतःचीच हाय-टेक विमाने बॉम्बने उडवली, अमेरिकेनं असं का केलं? 'त्या' रात्रीचा थरार व्हायरल VIDEO

ODI Record: क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात अजब रेकॉर्ड! शून्य धावा, शून्य विकेट्स; तरीही तो ठरला 'मॅन ऑफ द मॅच'!

SCROLL FOR NEXT